Close Visit Mhshetkari

Public Holidays : खुशखबर.. या दिवशी कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी! शासन निर्णय निर्गमित …

Public Holidays : लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम १३५(ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते.

गेल्या काही निवडणूकांमध्ये असे दिसून आले आहे की, संस्था / आस्थापना इ. भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नाहीत. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित रहावे लागते, जे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.

या दिवशी भरपगारी सुट्टी

भारत निवडणूक आयोगाने मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२३ चा कार्यक्रम जाहिर केलेला आहे. सदर निवडणूकीचे मतदान छत्तीसगढ राज्यात मंगळवार, दिनांक ०७ नोव्हेंबर, २०२३ व शुक्रवार, दिनांक १७ नोव्हेंबर, २०२३ रोजी मध्यप्रदेश राज्यात शुक्रवार, दिनांक १७ नोव्हेंबर, २०२३ रोजी आणि तेलंगणा राज्यात गुरुवार, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३ रोजी होणार आहे. छत्तीसगढ़, मध्यप्रदेश आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेलगतचे जिल्हे खालील तक्त्यात दिल्याप्रमाणे आहेत.

  • छत्तीसगढ़ – मंगळवार, दिनांक ०७ नोव्हेंबर, २०२३ शुक्रवार, दिनांक १७ नोव्हेंबर, २०१३ शुक्रवार, (गोंदिया, गडचिरोली)
  • मध्यप्रदेश – दिनांक १७ नोव्हेंबर, २०१३ शुक्रवार (नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती)
  • तेलंगणा – गुरुवार, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३ (नागपूर, भंडारा, गोंदिया गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, आणि नांदेड)
हे पण वाचा ~  Public holiday list : मोठी बातमी ... या जिल्ह्यात मकर संक्राती निमित्त सुट्टी जाहीर! पहा संपुर्ण जिल्ह्यांच्या स्थानिक सुट्टया ..

Public Holidays for employees

मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्यांतील जे मतदार महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. तथापि, त्यांची नावे मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणा विधानसभा राज्यांतील मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत अशा मतदारांना मतदानाच्या दिवशी त्याचा मतदानाचा हक्क योग्य रितीने बजावता यावा यासाठी खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत.

निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात आली आहे.

Leave a Comment