Fitment Factor : मोठी बातमी… 48 लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ ! मोदी सरकार करणार ही’ मोठी घोषणा ?

Fitment Factor : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची घोषणा करू शकतात. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

Goverment employees salary

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के आहे. जर हा फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवला गेला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होईल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याच्या मागणीला केंद्रीय कर्मचारी संघटना अनेक दिवसांपासून करत आहेत.त्यांची मागणी मान्य करून सरकार अंतरिम अर्थसंकल्पात ही घोषणा करू शकते. अंतरिम अर्थसंकल्पानंतर देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर होतील. अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी अर्थसंकल्पात ही घोषणा केली जाऊ शकते.

हे पण वाचा ~  Seventh Pay Commission : खुशखबर ... आता या राज्य सरकारी कर्मचार्‍यांना लागू झाला नवीन वेतन आयोग ...

फिटमेंट फॅक्टरमुळे पगारात वाढ कशी होते?

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा फिटमेंट फॅक्टर हा मूळ वेतनाचे प्रमाण ठरवतो. फिटमेंट फॅक्टर वाढल्याने मूळ वेतनात वाढ होते. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा ग्रेड पे 4,200 रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के असेल तर त्याचे मूळ वेतन 15,500 रुपये असेल. जर हा फिटमेंट फॅक्टर 3.68 पर्यंत वाढवला गेला तर त्याचे मूळ वेतन 22,224 रुपये होईल.

थोडक्यात फिटमेंट फॅक्टर वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारातही वाढ होईल. कारण मूळ वेतनात वाढ झाल्यामुळे भत्त्यांमध्येही वाढ होईल.

Leave a Comment