Close Visit Mhshetkari

Pan card Apply : खराब झालेले किंवा हरवलेले पॅनकार्ड; अवघ्या 50 रुपयात करा ऑर्डर

PAN Card Apply : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की पॅन कार्ड हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक असून पॅन कार्ड शिवाय कोणत्याही कामाला मुहूर्त लागत नाही.अशावेळी सरकारी कामांसाठी पॅन कार्ड हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो.

मात्र बऱ्याच वेळा आपले पॅन कार्ड जुने झालेले असते, किंवा खराब झालेले असते यामुळे आपल्याला पॅन कार्डची झेरॉक्स सुद्धा नीट मिळत नाही.अशावेळी डुप्लिकेट पॅन कार्ड किंवा ई – पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे त्यासंबंधी आपण सविस्तर माहिती या लेखांमध्ये बघणार आहोत.

डुप्लिकेट पॅन कार्ड ऑर्डर (New pan card apply)

  • तुम्हाला Google/crome वर जाऊन Reprint Pan Card सर्च करा.
  • तुम्हाला NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर पॅन कार्ड रीप्रिंट करण्याचा पर्याय दिसेल.त्यावर क्लिक करा.
  • तुम्ही येथे पॅन कार्ड क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड यासारखे पॅन कार्ड तपशील त्यात भरा.
  • आता नियम आणि अटी स्वीकारून सबमिट कराव्या लागतील.
  • आता समोर एक पेज उघडेल ज्यावर तुमच्या पॅनशी संबंधित सर्व माहिती रेकॉर्ड केली जाऊन Request OTP वर क्लिक करावे.
  • आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, तो येथे टाकुन प्रमाणीकरण करा.
  • यानंतर तुम्ही पॅन कार्ड मिळवण्यासाठी 50 रुपये शुल्क भरा.
  • शुल्क भरण्यासाठी आपण Net banking किंवा UPI वापरू शकता.
  • पेमेंट नंतर, तुमचे डुप्लिकेट पॅन कार्ड 7 दिवसांच्या आत वितरित करून पाठवले जाते.
हे पण वाचा ~  Pan Card : मोठी बातमी ... पॅनधारकांना दहा हजारांचा दंड; पॅन वापरताना घ्या काळजी !

आपले डुप्लिकेट पॅन कार्ड येथे ऑर्डर करा

Pan card apply

ई-पॅन कार्ड डाऊनलोड

NSDL किंवा UTITSL पोर्टलद्वारे ePAN कार्ड डाऊनलोड करण्याची प्रक्रिया सुद्धा उपब्धत आहे. ePAN कार्ड हा डिजिटल स्वाक्षरी असलेला कायमस्वरूपी खाते क्रमांक आहे, म्हणजे पॅन कार्ड जे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जारी केलेले ePAN कार्ड हे पॅन वैध पुरावा समजला जातो.

NSDL पोर्टल अंतर्गत, डाउनलोड ई-पॅन कार्ड सुविधेचे दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते, म्हणजे मागील 30 दिवसांत वाटप केलेले पॅन आणि 30 दिवसांपेक्षा जुने किंवा त्याहून अधिक काळ वाटप केलेले पॅन दोन्ही मार्गांनी ई-पॅन कार्ड डाऊनलोड खाली क्लिक करा.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment