Public Holidays : महाराष्ट्र अधिनियम, १८८१ (१८८१ चा २६) च्या कलम २५ खाली, जे अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३१/१/६८- जेयूडीएल तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्ट्या म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
माँ जिजाऊ जयंती निमित्त सुट्टी जाहीर!
दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी माँ जिजाऊ जयंती असल्याने दर वर्षा प्रमाणे सिंदखेडराजा ता.सिंदखेडराजा जि. बुलढाणा येथील होणा-या उत्सवा निमित्त जालना जिल्हयातील खाजगी अनुदानित/विनाअनुदानित/अशंतः अनुदानित/स्वयं अर्थसहाय्यित शाळा/जि.प.प्रा./कें.प्रा.शा./जि.प. प्रशाला/कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अंतर्गत जिल्हा परिषद जालना यांना या एक दिवसीय सुटटी देण्यात येत आहे.
बालकांचा मोफत व सक्कतीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 व शासनाने प्रचलित आदेश नियम मार्गदर्शक सुचना यानुसार आवश्यक किमान 230 शैक्षणिक दिवस शाळेचे कामकाज होईल, या अटीच्या अधिन राहून शाळांच्या सुट्यांचे नियोजन करण्याची सूचना देण्यात आली आहे.
संबधीत बदल करण्याचा निर्णय पालक शिक्षक संघाच्या बैठकीमध्ये मान्य केला जावा या अटीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता प्राचार्य/मुख्याध्यापक यांनी घ्यावी लागेल.