Close Visit Mhshetkari

UPI payment करणाऱ्यांसाठी खुशखबर .. ऑनलाइन पैसे पाठवण्याची लिमीट वाढवली! आता करता येणार …

UPI payment : रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी चलन विषयक समितीच्या बैठकीत केलेल्या निर्णयाची नुकतीच माहिती दिलेली आहे. त्यामध्ये सर्व सहमत सदस्यांच्या संमतीने रेपोर्ट स्थिर ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर यूपीआय संदर्भात सुद्धा नवीन नियम लागू करण्यात आले आहे. तर पाहूया काय आहे बातमी सविस्तर

UPI Transaction Limit

युपीआय व्यवहार करणाऱ्यांसाठी व्यवहाराची मर्यादा एक लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आपण एकाच वेळी पाच लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट गुगल पे , फोन पे किंवा पेटीएम द्वारे करू शकणार आहोत.

आज झालेल्या चलनविषयक समितीच्या बैठकीमध्ये आरबीआयने जीडीपी वाढीता वाढीचा अंदाज 6.50 वरून 7% केला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या तीन मध्ये जीडीपी चा आकडा 6.60% अपेक्षित आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीसाठी जाहीर झालेल्या आकडेवारीत GDP 6.6 टक्क्यांवर पोहोचला आहे.

महागाई दरात मोठी वाढ

जर महागाई बाबत विचार करायचा झाला तर, महागाई संदर्भात आरबीआय कडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे महागाई दर स्वामी असला तरी अन्नधान्य महागाई दरात झालेली वाढ चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे शक्तिकांत म्हणाले की, महागाईचा दर 4 टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आतापर्यंत आपण गाठू शकलो नाही. 

हे पण वाचा ~  UPI payment: फोन चोरीला गेला, फोनपे, गुगल पे आणि पेटीएमचा UPI ID कसा ब्लॉक करणार? पहा सर्व प्रोसेस ..

चलनवाढीचा दर वाढणार

चलनवाढीचा विचार करायचा झाला तर चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तेव्हाही किरकोळ चलनवाढीचा दर पाच पॉईंट सहा टक्के राहण्याची शक्यता आहे. त्याच वेळी चौथ्या ते माहिती 5.2% राहू शकते. एकूण संपूर्ण आर्थिक वर्षात हा आकडा सुमारे पासपोर्ट चार टक्के राहणार असल्याची शक्यता आहे.

रॉईटरस् केलेल्या सर्वेक्षणात 21 अर्थतज्ज्ञांनी नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसापासून कांदा आणि टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे महागाईबाबत सरकारने चिंता व्यक्त केली आहे. कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने कांदा निर्यात बंदीची मुदत वाढ केलेली आहे. ऑक्टोबर महिन्यात महागाई दर 4.87% वर घसरला होता.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment