Close Visit Mhshetkari

Credit Card : मोफत क्रेडिट कार्डचा वापर करताय का? मग अगोदर ह्या गोष्टी घ्या जाणून …

Credit card : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की बऱ्याच कंपन्या आता मोफत क्रेडिट कार्ड देत आहेत.त्याचबरोबर मोठा कॅशबॅक रिव्हर्स पॉईंट्स खूप सार्‍या सुविधा या कंपन्या मार्फत देत असतात.

तरीसुद्धा या कंपन्यांचा फायदा कसा होत असेल ? यांची कमाई काय असेल, हा प्रश्न आपल्या मनात नेहमी येत असतो. तर चला याविषयी आज सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. 

Credit Card Benifits

मित्रांनो क्रेडिट कार्डचा संदर्भात आपल्याला दररोज कोणत्या ना कोणत्या बँकेतून कॉल येत असेल जेव्हा एजंट लोकांना क्रेडिट कार्ड देण्यासाठी कॉल करतात तेव्हा ते सर्व आपल्याला फायदे सांगतात तुम्हाला मोफत क्रेडिट कार्ड देत असल्याचं सांगून त्याचे सर्व फायदे सुद्धा आपल्याकडून गिरवतात.

अनेक बँका अशाच अशा आहेत की ज्या वार्षिक शुल्क सुद्धा आकारत नाहीत मोफत क्रेडिट कार्ड म्हणजे ज्याच्यावर कोणता शुल्क आकारला जात नाही शिवाय बँक रिवॉर्ड फंड देतात या ग्राहकांसाठी फायद्याचं होऊ शकतात.काही प्रीमियम कार्ड विमानतळ लाउंज अॅक्सेसदेखील देतात. आता प्रश्न असा पडतो की क्रेडिट कार्ड कंपन्या सर्व काही मोफत देत असतात.

कमाई कशी करत असतील?

मग आपल्या मनात असा विचार येतो की एवढं सारं फ्री मध्ये देत असताना या बँकेची कमाई काय होत असेल किंवा हा बिजनेस कसा चालतो तर मित्रांनो एक गोष्ट निश्चित आहे की कंपन्यांना व्याजातून मिळणाऱ्या पैशावरती खूप काही अवलंबून असतं.

क्रेडिट कार्डाची रक्कम वेळेवर परत करत नाहीत आणि त्यावर व्याज आकारले जाते. क्रेडिट कार्डवर आकारले जाणारे व्याज देखील ३० ते ५० % दरम्यान असू शकते. 

हे पण वाचा ~  Cardit card : क्रेडिट कार्डच्या नावाखाली बँक आपली फसवणूक करत नाही ना? अशी घ्या काळजी

अनेक वेळा लोक ईएमआयवर वस्तू घेतात आणि त्यावर आकारण्यात येणाऱ्या व्याजातून पैसा मिळतो. 

ईएमआयवर वस्तू खरेदी करण्याच्या बाबतीत, व्याज दर फक्त १०-२० टक्क्यांदरम्यान राहतात.

क्रेडिट कार्ड कंपन्या कशी कमवतात?

क्रेडिट कार्ड कंपन्या व्याज, इंटरचेंज फी आणि शुल्क या तीन मुख्य मार्गांनी कमवतात.

व्याज :- क्रेडिट कार्ड कंपन्या त्यांच्या ग्राहकांकडून व्याज आकारतात. ग्राहक जेव्हा क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करतात तेव्हा त्यांना त्या महिन्याच्या शेवटी एक बिल पाठवले जाते. जर ग्राहक हे बिल पूर्णपणे भरत नसेल, तर त्याला व्याज आकारले जाते. क्रेडिट कार्ड कंपन्यांचे व्याजदर 18 ते 30% पर्यंत असू शकतात.

इंटरचेंज फी :- जेव्हा ग्राहक क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करतात तेव्हा विक्रेत्याला इंटरचेंज फी आकारली जाते. ही फी व्यवहाराच्या मूल्याच्या 1 ते 3% असू शकते. इंटरचेंज फी ही क्रेडिट कार्ड कंपनी आणि विक्रेत्या यांच्यात विभागली जाते.

शुल्क :- क्रेडिट कार्ड कंपन्या त्यांच्या ग्राहकांकडून विविध प्रकारचे शुल्क देखील आकारतात. यामध्ये वार्षिक फी, रोख अग्रिम फी, बॅलन्स ट्रान्सफर फी, उशीरा पेमेंट फी आणि विदेशी व्यवहार फी यांचा समावेश होतो.

क्रेडिट कार्ड कंपन्यांची कमाई : भारतात, क्रेडिट कार्ड कंपन्यांची कमाई वाढत आहे. 2022 मध्ये, भारतातील क्रेडिट कार्ड कंपन्यांची एकूण कमाई 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. यामध्ये व्याजाचा वाटा 60%, इंटरचेंज फीचा वाटा 25% आणि शुल्काचा वाटा 15% होता.

Leave a Comment