Eyes Flu : सतत पाऊस सूरू असल्या मुळे वाढत्या पाण्याची पातळी देशभरात गंभीर परिस्थिती निर्माण होते.सतत पाऊस चालू असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे व निपाणी असल्यामुळे पाणी साचल्यामुळे एकीकडे डोळ्याची साथ याचा धोका निर्माण झाला आहे 30 टक्के लहान मुलांमध्ये डोळ्याचे छातीचे प्रमाण आपल्याला दिसून येत आहे खूप पाऊस असल्यामुळे वाढत्या पाण्याची पातळी सगळीकडे गंभीर परिस्थिती निर्माण करत आहे. निर्माण झालेल्या डोळ्यांचा डोळ्यांचा धोका सुद्धा वाढू लागला आहे
आय फ्लू काय आहे
सध्या डोळ्यांना तापाची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. त्याची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती जाणून
सर्वत्र महानगरपालिकेला संपर्क साधून शाळांना सूचना देण्यात आल्या, आहेत लहान मुलांवर विशेष, लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. ज्या मुलांना डोळ्याच्या साथीची, लाग झाली आहे, त्यांना शाळेत न पाठवण्याच्या सूचना ,पालकांना देण्यात आल्या आहेत. काही प्रमाणात मोठ्या नागरिकांमध्ये देखील या साथीचा संसर्ग पाहायला मिळत आहे.
आय फ्लू म्हणजेच कंजंक्टिवायटिस याला डोळे लाल होणे असेही म्हणतात. हा एक संसर्ग आहे, ज्यामुळे कंजंक्टिवायटिसला जळजळ होते. कंजंक्टिवायटिसला हा एक स्पष्ट थर, असतो जो डोळ्याचा पांढरा भाग आणि पापण्यांच्या आतील अस्तरांना व्यापतो. पावसाळ्यात कमी तापमान आणि आर्द्रतेमुळे, लोकांना जीवाणू, विषाणू आणि ऍलर्जीक घटकांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे ऍलर्जीक प्रतिक्रिया आणि ,कंजंक्टिवायटिस सारखे संक्रमण होते. हा संसर्ग डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह आहे ज्यामुळे डोळ्याचा पांढरा भाग गुलाबी, किंवा लाल होतो.
प्रदूषण पसरवणाऱ्याया कारणांमध्ये सांडपाणी आणि इतर जीवाणूंचा समावेश होतो.
आय फ्लू’ची लक्षणं
- डोळे लालसर होणे
- डोळ्यांना सूज येते
- डोळ्यांना वारणवार खाज येते
- डोळ्यात जळजळ होते
- प्रकाशाची संवेदनशीलता
- डोळ्यातून पांढरा चिकट स्त्राव होतो
- डोळ्यातून सतत पाणी येते
डोळे आल्यास ही काळजी घ्या
- डोळ्यांना स्वच्छ पाण्याने धुत राहावे
- नेत्र संसर्ग असेपर्यंत कुटुंबापासून वेगळे तसेच सुरक्षित अंतर ठेवावे.
- डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा वापर करावा
- उन्हात काळ्या रंगाच्या चष्म्यांचा वापर करा