Close Visit Mhshetkari

Provident Fund : तुमचे PF खाते असेल तर ‘हे’ काम नक्की करा; नाहीतर EPFO च्या सुविधा होतील बंद

Provident Fund : आपण आपल्या बचतीसाठी अनेक मार्ग असा अवलंब करत असतो.कर्मचाऱ्यांना त्यांच्या 32 बचतीसाठी सरकारने प्रोव्हायडेड फंड ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आता ईपीएफओ संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले असून, बघूया सविस्तर माहिती

PPF Provident fund

आपल्याला माहिती असेल की,आपले बँक खाते असो किंवा बचत योजनेचे एखादी आरडी असो किंवा पीएफ असो आपल्या खात्याला नॉमिनी म्हणजे वारस नोंदणी करणे अत्यावश्यक असते.हीच गोष्ट आता ईपीएफ खात्याला सुद्धा लागू करण्यात आली आहे.आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने सर्व EPF सदस्यांसाठी नामांकन अनिवार्य केले आहे.

जर आपण नॉमीनी घोषीत केले नसेल तर ईपीएफओ खातेधारकाला अनेक सेवांपासून वंचित ठेवले जाणार आहे. या सुविधांमध्ये पीएफ खात्यातील बॅलन्स तपासणे देखील समाविष्ट आहे. नॉमिनी असल्याने, खातेदाराच्या मृत्यूनंतर,खातेदार ज्याला देऊ इच्छित आहे त्याला ते पैसे दिले जातात.एक खातेदार एकापेक्षा जास्त नॉमिनी देखील होऊ शकतो.

तुम्ही EPFO Account ऑनलाइन नामांकन करू शकता. PF खातेधारक आणि त्याच्या कुटुंबीयांना पीएफ लाभ देण्यासाठी E-Nominee खूप उपयुक्त आहे.पीएफ सदस्याचा मृत्यू झाल्यास भविष्य निर्वाह निधी,पेन्शन,विमा लाभांचा ऑनलाईन दावा आणि सेटलमेंट वारस नोंद केल्यावरच शक्य असते.

हे पण वाचा ~  Provident Fund : तुम्ही PF मधून कोणत्या उद्देशाने पैसे काढू शकता? लग्नासाठी पैसे कधी व किती वेळा काढू शकता; पहा नियम.

जर कर्मचार्‍याने नॉमिनीचा उल्लेख केला नसेल आणि कर्मचार्‍याचा मृत्यू झाला तर, त्यांच्या वारसांना PF सोडण्यासाठी उत्तराधिकार प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिवाणी न्यायालयात जावे लागेल.

कोणाला नॉमिनी बनवू शकता?

कर्मचारी आपल्या पीएफ खात्यास फक्त त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी नॉमिनी म्हणून नोंद करू शकतो.एखाद्याला कुटुंब नसेल, तर अशा परिस्थितीत तो इतर कोणत्याही व्यक्तीला आपला नॉमिनी म्हणून घोषित करू शकतो.नॉमिनी बनवल्यानंतर, कुटुंबाचा पत्ता माहीत असल्यास,नातेवाईक नसलेल्या व्यक्तीचे नामांकन रद्द केले जाते.

एक EPF खातेधारक एकापेक्षा जास्त नॉमिनी करू शकतो. एकापेक्षा जास्त नॉमिनी असल्यास,अधिक तपशील द्यावा लागेल. कोणत्या नॉमिनीला किती % रक्कम द्यायची हे स्पष्टपणे नमूद करावे लागेल.

ई-नामांकन अनिवार्य

आता ईपीएफओने ई-नॉमिनेशन अनिवार्य केले आहे.जर एखाद्या सदस्याने ई-नामांकन केले नाही,तर त्याचे पीएफ खाते शिल्लक आणि पासबुक पाहू शकत नाही. ई-नामांकनासाठी,खातेधारकाचा UAN सक्रिय असणे आवश्यक आहे.मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला असणे आवश्यक आहे.ऑनलाइन खातेदार घरी बसूनही ई-नामांकन करू शकतात.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment