Close Visit Mhshetkari

Family pension : मोठी बातमी.. या सरकारी कर्मचाऱ्यांना कुटूंब निवृत्तीवेतन योजना लागू ; शासन निर्णय निर्गमित

Family pension : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये दिनांक १.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS)/ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक ३१.०३.२०२३ च्या शासन निर्णयातील तरतूदी पुढीलप्रमाणे लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

कुटुंब निवृत्ती व रुग्णता निवृत्तीवेतन लागू

(अ) कर्मचाऱ्याचा सेवेत असतांना मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान लाभ घेता येईल.

(ब) रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे.

(क) सदर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास व रुग्णता निवृत्तीवेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ मधील तरतूदीप्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन / रुग्णता निवृत्तिवेतन लागू होईल.

Family pension and gratuity

प्राधिकरणाच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येणार आहे.

सेवानिवृत्ती उपदान व मृत्यु उपदानाच्या प्रयोजनार्थ सद्यःस्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ मधील तरतूदी लागू करण्यात आली आहे.

वित्त विभागाने संदर्भाधीन दिनांक २९.०९.२०१८ च्या शासन निर्णयान्वये लागू केलेली सानुग्रह अनुदान योजना प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना लागू असणार नाही.

दिनांक १.११.२००५ ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यु उपदान, कुटुंब निवृत्तीवेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णयासोबतचा नमुना- ३ मधील विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा लागेल.

हे पण वाचा ~  Employees Gratuity : निवडणुकीच्या धामधूमीत कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! DA वाढीनंतर ग्रॅच्युइटीतही घसघशीत वाढ ...

कुटुंब निवृत्तीवेतनधारकास त्याला मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज/लाभांसह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ अनुज्ञेय होईल.

सदर रक्कम समायोजित झाल्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकास नियमितपणे कुटुंब निवृत्तीवेतन अनुज्ञेय राहील.

DCPS NPS Amount

NPS / DCPS अंतर्गत सध्या कार्यरत असलेला व यापुढे प्राधिकरणाच्या सेवेत नियुक्त होणारा कर्मचारी यांनी त्यांचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ प्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन किंवा रुग्णता निवृत्ती वेतन अनुज्ञेय करण्यात येईल.

PRAN मध्ये जमा असलेली संचित रक्कम निवृत्तीवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या,आदेशानुसार अनुक्रमे कुटुंबास किंवा त्याला मिळण्याबाबतचा सोबतचा नमुना-२ मध्ये विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा लागणार आहे.

कुटुंब निवृत्ती व रुग्णता निवृत्तीवेतन शासन निर्णय येथे डाऊनलोड करा

Family pension gratuity

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

1 thought on “Family pension : मोठी बातमी.. या सरकारी कर्मचाऱ्यांना कुटूंब निवृत्तीवेतन योजना लागू ; शासन निर्णय निर्गमित”

  1. जर् NPS योजनाच बंद केली तर् महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून tax payer चां जो हजारो करोड़ रुपये प्रत्येक महिन्याला share market मधे बुडालेल्या कंपन्या वर् आणण्यासाठी खर्च केला जातो तों mahrashtra च्या विकासा साठी खर्च करता येईन, आणि महाराष्ट्राच्या पैसा महाराष्ट्रातच राहींन

    Reply

Leave a Comment