Id card for employees : राज्यातील नागरिक त्यांच्या कामाच्या निमित्ताने निरनिराळ्या शासकीय कार्यालयांत येत असतात. त्यांच्या कामाशी संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे नाव व पदनाम माहीत होण्यासाठी किंवा त्यांची भेट घेण्यासाठी संबंधित अधिकारी / कर्मचारी यांची ओळख पटणे आवश्यक आहे.यासंदर्भात आता राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.
New rules for State employees
सर्व शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी कार्यालयात असताना त्यांचे ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे, जेणेकरून याबाबत नागरिकांची तक्रार प्राप्त होणार नाही असे उपरोक्त दिनांक ०७ मे, २०१४ च्या शासन परिपत्रकान्वये सूचित करण्यात आले आहे.
तसेच सदर सूचनांची अमंलबजावणी करण्यात कुचराई करणाऱ्या संबंधित अधिकारी / कर्मचारी यांच्याविरुद्ध वरिष्ठ अधिका-यांनी योग्य ती कारवाई करावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
आता कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक
शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रवेशाच्या वेळी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या ओळखपत्राची काटेकोरपणे तपासणी करून ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे संबधित प्रशासकीय विभागांना पाठवावीत.
सरकारी कर्मचारी, सातवा वेतन आयोग, जुनी पेन्शन, शासन निर्णय, सरकारी योजना, महागाई भत्ता,संदर्भात लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन
संबंधित प्रशासकीय विभागांनी ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणाऱ्या कर्मचान्यांबाबत कारवाई करून त्याचा मासिक अहवाल विहित विवरणपत्रात (परिशिष्ट “अ”) सामान्य प्रशासन विभाग (प्र.सु.. र. व का.) यांच्याकडे सादर करावा लागणार आहे.
ओळखपत्र शासन निर्णय येथे डाऊनलोड करा