PF Check Balance: कर्मचारी वर्गांसाठी पीएफ खात्यामध्ये व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आणि कर्मचाऱ्यांना पूर्णपणे व्याज मिळेल कुठल्याही प्रकारचे त्यांचे नुकसान होणार नाही.
Provident fund calculator
ईपीएफओने असे आश्वासन ईपीएफओने लाभार्थ्यांना दिले आहे,कर्मचाऱ्यांच्या ख्यात्यावर व्याज जमा होणार आहे. खात्यावर व्याज जमा झाले की नाही हे तुम्हाला पासबूकमधून कळेल. त्यावर प्रोव्हिडंट फंडमधील जमा रक्कम दिसून येते. हे पासबूक ईपीएफओच्या संकेतस्थळावर मिळते.
नोकरी केली तर दर महिन्याला पगाराचा काही भाग भविष्य निर्वाह निधीत जमा होतो. ही रक्कम मूळ वेतनाच्या 12 % आहे. तीच रक्कम तुमची कंपनी देखील जमा करत असते. मात्र, यातील 8.33 टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेत म्हणजेच ईपीएसमध्ये आणि उर्वरित 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जमा केली जात आहे.
उमंग ॲपद्वारे तपासा बॅलन्स
- स्मार्टफोनवर प्ले स्टोअरवरून उमंग ॲप डाउनलोड करा.
- त्यानंतर तुमचा फोन नंबर रजिस्टर करून ॲपमध्ये लॉग इन करा.
- त्यानंतर वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनूवर जा.
- आता मोबाईल नंबर, माझी ओळख, डिजीलॉकरद्वारे लॉगिन करा.
- नोंदणीनंतर तुम्हाला उमंग अॅपच्या सर्चवर सर्व्हिसेस लिहून सर्चवर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्याकडे ईपीएफओचा सर्व्हिस शो असेल. आता सर्व्हिस पर्याय निवडा.
- यानंतर, पीएफ खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी पासबुकवर क्लिक करा.
- आता तुम्हाला UAN नंबर टाकावा लागेल.
- त्यानंतर मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
- ओटीपी टाकल्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करा.
- येथे EPFO पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर, व्ह्यू पासबुकमध्ये गेल्यानंतर, OTP द्वारे तुमचा UAN क्रमांक आणि शिल्लक तपासा.
ऑनलाइन शिल्लक कशी तपासणार
तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या तुमची खात्यातुल शिल्लक तपासू शकता. हे केल्यानंतर, तुम्हाला पीएफ खात्याशी संबंधित माहिती दिसू लागेल. येथे तुम्हाला सदस्य ID दिसेल. तुम्ही ते निवडल्यास, तुम्हाला तुमची पीएफ शिल्लक ई-पासबुकवर दिसेल.
तुम्हाला उमंग अॅप द्वारे तुमच्या खात्यात किती रक्कम आहे व किती वेळा जमा झाले आहे याविषयी तुम्हाला माहिती मिळू शकते. उमंग अॅप चा उपयोग कशा प्रकारे केला जातो हे आपण या लेखांमध्ये बघितले आहे.
आपली पीएफ रक्कम ऑनलाईन येथे चेक करा 👉 PF Balance