PPF calculator : सध्या पीपीएफ योजनेबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. तर या पीपीएफ योजनेमध्ये पैसे गुंतवल्यानंतर त्याचा परतावा कसा मिळतो.यामध्ये आपण जर गुंतवणूक केली तर किती प्रमाणात नफा मिळतो या गुंतवणुकीचे फायदे काय ? या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.
पीपीएफ ऑनलाईन कॅल्क्युलेटर
भारतातील कोणताही नागरिक पीपीएफ योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो पीपीएफ मध्ये दरवर्षी आपण जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये तर कमीत कमी 500 रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकतो.ज्यामध्ये कोणतीही चुकी नसते आणि नफा सुद्धा चांगला मिळण्याची गॅरंटी मिळत असते.
PPF कॅल्क्युलेटरनुसार, जर पीपीएफमध्ये दरमहा 2 हजार रुपये गुंतवले तर, एका वर्षात 24,000 रुपयांची गुंतवणूक होते.याप्रमाणे 15 वर्षांत आपली एकूण 3 लाख 60 हजार रुपये गुंतवणूक होते. जर 7.1 % चक्रवाढ व्याज पकडले तर 2 लाख 90 हजार रुपये मिळतील. थोडक्यात मॅच्युरिटी वेळी एकूण 6 लाख 50 हजार रुपये मिळतील.
PPF Scheme Benefits
जर आपण पीपीएफ योजनेत दरमहा 3 हजार रुपये गुंतवणूक केल्यास, एका वर्षात एकूण 36 हजार रुपये गुंतवणूक होते.15 वर्षांत 5 लाख 40 हजार रुपये जमा होतील.जर 7.1 % चक्रवाढ व्याज पकडले तर 4 लाख 36 हजार रुपये त्यावर व्याज मिळेल. अशा प्रकारे 15 वर्षांनी योजना मॅच्युअर होईल आपल्याला 9 लाख 76 हजार रुपये मिळतील.
आपण जर पीपीएफमध्ये दरमहा 4 हजार रुपये गुंतवल्यास आपली वार्षिक गुंतवणूक 48000 रुपये होईल आणि 15 वर्षांत आपली एकूण 7,20,000 रुपये गुंतवणूक केली जाते. आपल्या रक्कमेवर 7.1 % व्याजदरानुसार केलेल्या गुंतवणुकीवर व्याज म्हणून 5,81,827 रुपये मिळतील. त्याच वेळी तुमची मॅच्युरिटीची रक्कम जवळपास 13 लाख रुपये असेल.
PPF Investment tips
जेव्हा पीपीएफमध्ये दर महिन्याला 5000 रुपये जमा केली जाते, तेव्हा एका वर्षात एकूण 60,000 रुपये जमा होईल आणि 15 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 9 लाख रुपये होते.यावरील व्याजाबद्दल बोलायचे झाल्यास सध्याच्या व्याजदरानुसार 7,27,284 रुपये रक्कम व्याज म्हणून मिळेल अशा प्रकारे या PPF योजनेद्वारे मॅच्युरिटीवेळी 16,27,284 रुपये मिळतील.
Tip :- म्युच्युअल फंड,शेअर मार्केट मधील गुंतवणूक ही बाजारअधीन आहे. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ल्यानुसार योग्य फंड निवडावा.आपल्या गुंतवणुकीचा सातत्याने पडताळा घेतला जावा.