Close Visit Mhshetkari

DCPS NPS Amount : राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) लागू असलेल्या ‘ या ‘ कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय ! आता खात्यात वर्ग होणार एवढी रक्कम ..

DCPS NPS Amount : राज्यातील कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थांमध्ये दिनांक ०१ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी यांना राज्य शासनाची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली होती.

NPS Amount transfer Budget

कालांतराने वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत स्तर-१ ची कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली होती.आता महाराष्ट्र राज्यातील कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थांमधील अधिकारी / कर्मचान्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) (स्तर-१) लागू करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेत सहभागी असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांची माहे मार्च २०२३ पर्यंतची नियोक्ता व कर्मचारी हिस्सा व त्यावरील व्याजाची रक्कम राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये हस्तांतरीत करण्यासाठी वित्तीय सल्लागार, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी यांच्या पत्रान्वये रु.३२१,३०,५२,१६१/- इतका निधी उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती केली होती.

एनपीएस खात्यात रक्कम होणार वर्ग

राज्यातील कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थांमधील नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू असलेले शिक्षक व शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचारी हे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट झाले आहेत.

हे पण वाचा ~  NPS DCPS Amount : जुनी पेन्शन योजना संदर्भांत नवीन शासन निर्णय निर्गमित ! आता यांना होणार लागू ...

आता सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेमध्ये जमा झालेली रक्कम, त्यावरील शासनाचे अंशदान व व्याज अशी एकूण रु.३२१,३०,५२,१६१ /- (अक्षरी तीनशे एकवीस कोटी तीस लाख बावन्न हजार एकशे एकसष्ट रुपये फक्त) एवढी रक्कम केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण (NSDL) कडे वर्ग करण्याकरिता विद्यापीठ निहाय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू असलेले शिक्षक व शिक्षकेत्तर अधिकारी / कर्मचान्यांची परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेमध्ये जमा झालेली रक्कम, त्यावरील शासनाचे अंशदान व व्याजाची रक्कम केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण (NSDL) कडे वर्ग करण्याकरिता खालील लेखाशिर्षांतर्गत निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना,(००) (१५) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्थांमधील अधिकारी / कर्मचाऱ्यांची जमा झालेली रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेखाली वर्ग करणे (अनिवार्य) (८३४२०२९३)

सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २८६/२०२३/व्यय-१३ दि.२०/१०/२०२३ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेरा अनुसरुन निर्गमित करण्यात येत आहे.

Leave a Comment