DA Hike : आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ! आता फरकासह मिळणार 50 टक्के दराने महागाई भत्ता …

DA Hike : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदच्या आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आपल्याला माहिती असेल की केंद्र सरकारने महागाई भत्ता मध्ये डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024 मध्ये सुद्धा मध्ये वाढ केली होती. मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा प्रश्न प्रलंबित होता.

DA hike Maharashtra 

आता राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १० जुलै, २०२४ रोजी मंजूर करण्यात आला आहे.

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

महाराष्ट्र राज्य सरकारने आता असा आदेश दिला आहे की, दिनांक १ जानेवारी, २०२४ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४६% वरुन ५०% करण्यात आला आहे.

हे पण वाचा ~  सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यासंदर्भात मोठी अपडेट्स समोर! पहा शासन निर्णय || HRA allowance

सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२४ ते दिनांक ३० जून, २०२४ या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै, २०२४ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.

आपला महागाई भत्ता वाढ येथे चेक करा ➡️ DA Hike Calculator

Dearness Allowance Arrears

महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षांखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात येणार आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०७१०१०५२२८९५०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

Leave a Comment