Close Visit Mhshetkari

Retirement Planning : आतापासूनच करा सेवानिवृत्ती नंतरची आर्थिक प्लॅनिंग! नोकरदारांसाठी तीन सर्वोत्तम पर्याय, जाणून घ्या सविस्तर

Retirement Planning : आपण जर सरकारी नोकरीला असाल आणि भविष्याच्या दृष्टीने आत्तापासून नियोजन करणार असाल तर तुमच्यासाठी उपयोगी पडेल अशी माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.जेणेकरून सेवानिवृत्तीनंतर तुमच्याकडून जमा झालेला निधीच उपयोगी पडतो.

मित्रांनो वृद्धापकाळात जर पुरेशा निधी उभरायचा असेल तर आत्तापासूनच आपल्याला नियोजन करावे लागेल. साहजिकच यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक शुद्धी करावी लागेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर अशी सुरक्षित गुंतवणूक कुठे करावी त्याचा परतावा किती मिळेल? चांगल्या गुंतवणुकीचे पर्याय कोणते? याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

वॉलेन्टरी पब्लिक फंड (VPF)

जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला VPF म्हणजेच ऐच्छिक भविष्य निर्वाह निधीबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.पगारदार लोकच याचा लाभ घेऊ शकतात. सरकारी कर्मचाऱ्याला EPFO मध्ये उपलब्ध असलेले सर्व फायदे दिले जातात.

भविष्य निर्वाह निधी योजनेत मूळ पगार आणि महागाई भत्त्याच्या 12 % आपल्या जीपीएफ खात्यात जमा केली जाते.कर्मचारी रक्कम नियोक्ता दरमहा खात्यात जमा करतो. पण तुम्ही VPF द्वारे PF मध्ये तुमचे योगदान वाढवू शकता.पीएफ हे गुंतवणुकीचे सुरक्षित साधन मानले जाते.सध्या व्हीपीएफमध्ये 8.15 टक्के दराने व्याज दिले जात आहे.

हे पण वाचा ~  SIP vs Home Loan || आपली पगारवाढ झाली? SIP गुंतवणूक करावी की गृहकर्ज फेडावे? काय करणे योग्य? जाणून घ्या

म्युच्युअल फंड (Mutual Fund)

आजकालच्या जमान्यामध्ये म्युच्युअल फंड किंवा एसआयपी मध्ये गुंतवणूक करणे हा फायदेशीर आणि उत्तम पर्याय मांडला जात आहे जवळपास सर्वच जण यामध्ये SIP मध्ये गुंतवणूक करू शकतात.

SIP द्वारे तुम्ही किमान 500 रुपयांची गुंतवणूक सुरू करून उत्पन्न गुंतवणूक वाढवू शकता.बहुतेक असे दिसून आले आहे की सरासरी परतावा 12 % पर्यंत मिळू शकतो.

Public Provident fund

सरकारी, खाजगी नोकरदार असो सर्वच भारतीय यामध्ये गुंतवणूक करू शकतात. सध्या तुम्हाला PPF वर 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे. तुम्ही पीपीएफमध्ये वार्षिक 500 ते 1.5 लाख रुपये जमा करू शकता.

सर्वोत्तम SIP प्लॅन येथे पहा, जे देतात जबरदस्त रिटर्न

Best SIP List

Leave a Comment