Close Visit Mhshetkari

Post Office Scheme : फक्त 50 रुपयांपासून गुंतवणूक अन् 35 लाखांचा परतावा; मिळणार 4 वर्षांनी कर्ज, बोनसचा लाभ! 

Post Office scheme : ग्रामीण भागात अर्थव्यवस्था शहरांपेक्षा खूप वेगळी असते.परिणामी ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना सर्व सोयीसुविधा देण्यासाठी सरकार सतत प्रयत्न करत आहे.

बरेच लोक LIC आणि Bank FD देखील गुंतवणूक करतात, परंतु काही post office scheme देखील गुंतवणूक वाढविण्यात उपयुक्त ठरत आहेत.

Post Office Gram Suraksha Yojana

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा अशी योजना आहे, जी देशातील ग्रामीण लोकांसाठी चालवली जाते. सदरील योजनेत सामील होणाऱ्या लाभार्थ्यांना प्रतिदिन 50 रुपये गुंतवावे लागतात. पण हे पैसे दररोज भरावे लागणार नाहीत, तर प्रत्येक महिन्याला एकरकमी 15हजार रुपये जमा करून बदल्यात ठराविक कालावधीनंतर तब्बल 35 लाख रुपये मिळू शकतात.

ग्राम सुरक्षा स्किममध्ये 19 ते 35 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस अर्ज करू शकतो. सदरील योजनेत 10 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

ग्राम सुरक्षा योजनेचा लाभ कसा मिळवावा? 

  • भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेसाठी अर्ज करू शकतो. 
  • 10 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
  • योजनेतील पैसे दरमहा, तिमाही,सहामाही किंवा वार्षिकही गुंतवले जाऊ शकतात.
हे पण वाचा ~  Post office scheme : पोस्टाच्या या योजनेत गुंतवा पैसे ,मिळवा करमुक्त लखोचा फायदा !

कर्ज आणि बोनस सुविधा

विशेष म्हणजे गुंतवणुकदार लाभार्थ्यांच्या वयाच्या 80 व्या वर्षपर्यंत मृत्यू झाल्यास बोनससह संपूर्ण रक्कम लाभार्थीच्या वारसाला मिळते.

या पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना 4 वर्षांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर्जाची सुविधा देखील प्रदान करण्यात येते. 

आपण 5 वर्षे सतत गुंतवणूक केली असेल तर बोनस देखील मिळणे सुरू होते.

जर लाभार्थी गुंतवणुकीच्या मध्येच सरेंडर करू इच्छित असेल तर, पॉलिसीच्या तारखेपासून 3 वर्षांनी ही सुविधा देखील उपलब्ध आहे.

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना कॅल्क्युलेटर
  • पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लाभार्थींना नियमांनुसार वयाच्या 55 वर्षांच्या गुंतवणुकीवर 31 लाख 60,000 रुपये, 
  • वयाच्या 58 वर्षांच्या गुंतवणुकीवर 33 लाख 40,000 रुपये आणि 
  • 60 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 34 लाख 60,000 रुपये नफा मिळतो. 
  • पॉलिसीची संपूर्ण रक्कम म्हणजे 35 लाख रुपये वयाची 80 वर्षे पूर्ण केल्यावर सुपूर्द केली जाते.

अधिक माहितीसाठी, तुम्ही भारतीय पोस्ट www.indiapost.gov.in च्या अधिकृत साइटला भेट द्या किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा .

सूचना : योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीक पोस्ट ऑफिसमधून नक्की भेट द्या आणि योजनेत बदल झाला असल्यास समजून घ्या.  

2 thoughts on “Post Office Scheme : फक्त 50 रुपयांपासून गुंतवणूक अन् 35 लाखांचा परतावा; मिळणार 4 वर्षांनी कर्ज, बोनसचा लाभ! ”

Leave a Comment