PPost office : अनेकजण आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असतात. जास्त परतावा देणाऱ्या आणि कोणतीही जोखीम नसणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यात अनेकांचा कल असतो. तुम्हीही या योजनेत गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकता.दरम्यान, पोस्ट ऑफिस प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असते.
त्यामुळे अनेकजण या योजनेत गुंतवणूक करत आहेत. आता तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये मिळतील. काय आहे ही भन्नाट योजना जाणून घ्या.
खाते सुरु करण्याची प्रक्रिया
कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिसच्या या योजनेत खाते सुरु करू शकते. या योजनेत खाते सुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त १,००० रुपयांची गरज आहे. तर वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती खाते उघडू शकते. पोस्ट ऑफिस MIS मध्ये एकल आणि संयुक्त दोन्ही खाती उघडण्याचा पर्याय आहे.
महिन्याला मिळेल एवढी रक्कम
या योजनेत 6.6 टक्के वार्षिक व्याज दिलं जात आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने यामध्ये 9 लाख रुपयांची गुंतवणूक संयुक्त खात्याद्वारे केली असेल तर त्याला वार्षिक 6.6 टक्के दराने 59,400 रुपये मिळतील. एका महिन्याचा विचार केल्यास ते 4,950 रुपये हे गुंतवणूकदार दर महिन्याला घेऊ शकतात. ही फक्त व्याजाची रक्कम आहे, गुंतवणूकदाराची मूळ रक्कम ही तेवढीच राहनार.
खाते उघडण्यासाठी आवश्यक बाबी?
पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजना खाते उघडण्यासाठी, तुमच्याकडे आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मतदार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
यासोबतच २ पासपोर्ट आकाराचे फोटोही आवश्यकआहे.
तुम्हाला तुमच्या नॉमिनीचे नावही लागणार.
तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मासिक उत्पन्न योजनेचा फॉर्म भरून खाते उघडू शकता. अथवा ऑनलाइन फॉर्मदेखील डाउनलोड करा
MIS is looking the best scheme