Close Visit Mhshetkari

Pan Card : मोठी बातमी … पॅनधारकांना दहा हजारांचा दंड; पॅन वापरताना घ्या काळजी !

Pan Card : पॅन क्रमांकाचा वापर करताना करदात्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. चुकीचा पॅन क्रमांक टाकल्यास १० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.पॅन क्रमांकाविषयीचे आयकर विभागाचे नियम खूप कडक आहेत.

Pan Card new updates

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आयकर वरून पत्र भरताना आपण जर चुकीचा पॅन कार्ड अपलोड केला किंवा टाकल्यास आपल्याला दंड होऊ शकतो.

आपले पॅन कार्ड चोरी झाल्यास तात्काळ पोलिसात तक्रार नोंदवणे आवश्यक असते तुमच्या पॅन कार्डचा वापर चुकीच्या व्यक्तीच्या हाता गेल्यानंतर होऊ शकतो फसवणूक अथवा घोटाळे टाळण्यासाठी आपण ही काळजी घ्यावी.

आयकर कायद्याचा आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे एकापेक्षा अधिक पॅन कार्ड वापरणे सुद्धा गुन्हा आहे.आपल्याकडे जर एकापेक्षा अधिक पॅन कार्ड असेल तर तात्काळ आयकर विभागास परत करावे अन्यथा आयकार विभाग तुमचे एक कार्ड रद्द करून तुम्हाला दंड लावू शकते.

हे पण वाचा ~  PAN Card हरवलेय, खराब झाले ? टेन्शन नको, आजच डाऊनलोड करा e-PAN, सोपी आहे प्रोसेस..

Aadhaar card pan card linking

आयकर विभागाने ट्वीट करून पॅन-आधार कार्डसह लिंक न करणाऱ्यांना इशारा दिला आहे.आता पॅन-आधार लिंक न केल्यास पॅन कार्डाचा काहीही उपयोग राहणार नाही.आयकर कायदा,1961 नुसार,सर्व पॅन धारकांसाठी आधारशी लिंक करणे आवश्यक केले आहे.

पॅन कार्ड डीएक्टीव्हेट झाल्यास म्युचुअल फंड,स्टॉक आणि बँक खातं उघडता येणार नाही.तसेच पॅन कार्डचा पुरावा म्हणूनही उपयोग करता येणार नाही.शिवाय 10 हजार रुपयांपर्यंत दंडही भरावा लागू शकतो.

Leave a Comment