Close Visit Mhshetkari

Whatsapp Feature : व्हॉट्सॲप चे हे सिक्रेट फिचर्स तुम्हाला माहितीय आहे का? नसेल तर लगेच माहिती करुन घ्या!

Whatsapp Feature : मित्रांनो आपल्याला माहित आहे की, व्हॉट्सॲप हे जगातील सर्वात मोठे मेसेजिंग ॲप आहे. सद्या जगातील जवळपास 2 अब्जांहून अधिक लोक याचा वापर करत आहे.

आपण सर्व जण व्हॉट्सॲप वापरत असतो,पण असे अनेक फीचर्स असतील जे आपल्याला माहित नसतात.आज आपण व्हॉट्सॲपच्या काही टॉप फीचर्सविषयी सांगणार आहोत. जे फिचर्स तुम्हाला माहित असायला हवेत.

Whatsapp Feature 2024

सायलेंट ग्रुप नोटिफिकेशन :- व्हॉट्सॲप ग्रुपवर येणारे मेसेजेस टाळण्यासाठी, तुम्ही ते ग्रुप सायलेंट करू शकता. यासाठी व्हॉट्सॲप उघडा आणि ग्रुपवर टॅप करुन वरच्या उजव्या कोपऱ्यात तीन बिंदूवर टॅप करा.”म्यूट ग्रुप” वर टॅप केल्यावर तुम्ही ग्रुपला 8 तास, एक आठवडा किंवा कायमस्वरूपी म्यूट करू शकता.

मिडीया डाऊनलोडर कंट्रोल :- व्हॉट्सॲपमध्ये मीडिया (फोटो, व्हिडिओ,ऑडिओ) डाऊनलोड करण्यासाठी सेटिंग्जवर टॅप करुन”डेटा आणि स्टोरेज” वर टॅप करावे.”मीडिया डाऊनलोड” वर टॅप केल्यावर नेहमी डाउनलोड करा,वाय-फायवरच डाउनलोड करा,कधीही डाउनलोड करू नका यापैकी हवे असलेल्या एकापर्यायावर क्लिकवर करा.

स्टेटस प्रायव्हसी :- तुम्ही तुमचे व्हॉट्सॲप स्टेटस कोणाला पाहू शकतो हे नियंत्रित करू शकता. यासाठी, व्हॉट्सॲप उघडा आणि सेटिंग्जवर टॅप करुन”अकाऊंट” वर टॅप केल्यावर”प्रायव्हसी” वर टॅप करा आणि”स्टेटस” वर टॅप करा.येथे तुम्ही खालील पर्याय निवडू शकता.माझे कॉन्टॅक्ट्स,माझे कॉन्टॅक्ट्स वगळता सर्व,फक्त माझे संपर्क

टू-स्टेप सिक्युरिटी :- तुमचे व्हॉट्सॲप खाते अधिक सुरक्षित करण्यासाठी, तुम्ही टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू करू शकता.यासाठी,व्हॉट्सॲप मध्ये सेटिंग्जवर टॅप करावे.”अकाऊंट” वर टॅप करून “टू-स्टेप व्हेरिफिकेशन” वर टॅप केल्यानंतर”टू-स्टेप व्हेरिफिकेशन चालू करा” वर टॅप करावे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment