Education news : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद शिक्षकांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आणि महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे.शिक्षकांच्या बदल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील घटती पटसंख्या यामुळे प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, तर बघूया सविस्तर
शिक्षक बदल्या कायमच्या बंद?
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील जवळपास साडेतीन हजार शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. विशेष म्हणजे १० पेक्षा कमी पट असलेल्या जवळपास दीड हजार शाळांचे आता 1 किलोमीटरवरील दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे.
राज्यातील अनेक शाळांचा पट शिक्षकांच्या बदलल्यानंतरच कमी झाल्याची धारणा प्रशासनाची झाली आहे, परिणामी आता शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या कायमच्या बंद करण्याचा प्रस्ताव देखील शालेय शिक्षण विभागाने ‘ग्रामविकास’ला पाठवलेला आहे.
विद्यार्थी संख्येत मोठी घट
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या परिपत्रकानुसार २०२१-२२ मध्ये विद्यार्थी संख्या खालील प्रमाणे होती.
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये ५४ लाख २४ हजार ७२३ विद्यार्थी होते.
- जिल्हा परिषद शाळांमध्ये ४५ लाख ५८ हजार आठ विद्यार्थी, महापालिकांच्या शाळांमध्ये सहा लाख ८० हजार ४३ नगरपालिकांच्या शाळांमध्ये एक लाख ८६ हजार २८४ विद्यार्थी
- थोडक्यात सन २०२२-२३ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पटसंख्या साडेतीन लाखाने कमी झाली आहे.
- जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या शाळांचीच पटसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या दोन हजार ७९५ शाळांमधील पटसंख्या मागच्या वर्षी जवळपास १५ हजाराने कमी झाली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या २७४ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी असून,४३ शाळांमध्ये 10 पेक्षा कमी विद्यार्थी आहेत.
‘पवित्र’ पोर्टल सुरू होणार
जिल्हा परिषद शाळेसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची पदे पवित्र पोर्टल द्वारे भरली जाणार आहेत. साधारणपणे पहिल्या टप्प्यात ६७ हजार रिक्त पदांपैकी ३० हजार पदांची भरती केली जाईल.
जिल्हा परिषद व खाजगी शाळांची घटलेली विद्यार्थी संख्येमुळे शिक्षक भरती नियोजन बदलणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या शिक्षक बिंदूनामावलीनुसार केवळ १५ ते १८ हजारांपर्यंतच शिक्षकांची भरती केली जाऊ शकणार आहे.