PF Rule Change : नमस्कार मित्रांनो सरकारने नुकतेच कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच EPS 1995 मध्ये बदल केला आहे. आता कर्मचाऱ्यांना सहा महिने पेक्षा कमी कालावधी मध्ये नोकरी सोडली असेल किंवा पैसे भरले असेल तरीसुद्धा पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
EPFO New Rules 2024
सदरील बदलामुळे लाखो EPS धारकांना मोठा फायदा होणार आहे. मित्रांनो मोठी गोष्ट म्हणजे दरवर्षी लाखो कर्मचारी EPS सदस्य पेन्शनसाठी आवश्यक 10 वर्षांची सेवा पूर्ण करण्यापूर्वी योजना सोडतात. विशेष बाब म्हणजे यामध्ये 6 महिन्यांत ही योजना सोडणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
EPS अंतर्गत, सरकारने दहा वर्षे सेवा पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योजना सोडली असली तरी पैसे करण्याची मुभा दिली होती परंतु सहा महिन्या अगोदर योजना सोडलेल्या कर्मचाऱ्यांना सदरील संधीचा लाभ घेता येत नव्हता. आता मात्र हा नियम बदलून दिल्यामुळे जवळपास 7 लाखांहून अधिक ईपीएस सदस्यांना फायदा होईल.
जुन्या नियमामुळे अनेक सदस्य 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत बाहेर पडत असल्याने 7 लाख दावे नाकारण्यात आले होते. आता हे EPS सदस्य ज्यांचे वय दिनांक 14.06.2024 पर्यंत 58 वर्षे पूर्ण झाले नाही त्यांना पैसे काढण्याचे फायदे मिळतील.
What is EPS ?
EPS ही एक पेन्शन योजना असून EPFO द्वारे चालवली जाते. सदरील योजनेंतर्गत 10 वर्षांसाठी पैसे गुंतवावे लागतात. सदरील योजनेचा सदस्य असलेला कर्मचारी निवृत्तीनंतर निवृत्तीवेतनासाठी पात्र ठरतो. विद्यमान आणि नवीन EPF सदस्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
नियोक्ता/कंपनी आणि कर्मचारी दोघेही EPF निधीमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 12% समान योगदान जमा करतात. संपूर्ण कर्मचाऱ्यांचे योगदान EPF मध्ये तर नियोक्ता/कंपनीचा 8.33% हिस्सा EPS मध्ये आणि 3.67% दरमहा EPF मध्ये जाते.
Very interesting information!Perfect just what I was searching for!Blog monetyze