Close Visit Mhshetkari

Old pension : जुनी पेन्शन योजना लागू होणार? सरकार दरबारी मोठ्या हालचाली …

Old pension : जुना पेन्शन योजने संदर्भात महत्त्वाची अत्यंत महत्वपूर्ण आणि खात्रीला एक बातमी समोर आली असून यासंदर्भात सरकारी दरबारी मोठ्या हालचाली सुरू झाले आहे.

जुन्या पेन्शन योजनेबाबत – राज्य शासकीय मान्यताप्राप्त अधिकारी व कर्मचारी संघटने समवेत बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. पाहूया काय आहे सविस्तर बातमी

Old pension scheme update

मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दिनांक १३ डिसेंबर, २०२३ रोजी सायं. ०५.०० वा. मंत्रीमंडळ कक्ष,विधान भवन प्रांगण, नागपूर येथे उक्त विषयानुषंगाने बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

संबधित बैठकीस मा. उप मुख्यमंत्री (गृह/वित्त), मुख्य सचिव, अ.मु.स. (वित्त), अ.मु.स. (सा. प्र. वि. सेवा), अ.मु.स. (सा. प्र. वि.- र. व का. तथा गृह), प्रधान सचिव-नियोजन व अन्य आवश्यक अधिकारी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

हे पण वाचा ~  Old Pension : सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन संदर्भातला अहवाल अर्थमंत्री अजित पवारांना सादर !समितीच्या शिफारशी मध्ये...

जूनी पेन्शन योजना लागू होणार?

सदर बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ (श्री.कुलथे) व प्रतिनिधी, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना (श्री विश्वास काटकर) व प्रतिनिधी व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघ (श्री संभाजीराव थोरात) व प्रतिनिधी) या संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करावे असे मा. मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश आहेत.

ओल्ड पेन्शन स्कीम बाबत बैठकीचे आयोजन करुन संबंधितांना कळविण्याची व्यवस्था करावी अशी विनंती निलेश पोतदार(अवर सचिव) यांनी मा.अपर मुख्य सचिव- वित्त विभाग,मा. उप मुख्यमंत्री (गृह/वित्त) यांचे खाजगी सचिव मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचे व. स्वी.स. यांना केली आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment