7th pay da hike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर!लवकरच होणार ….

7th Pay Da Hike : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचे आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली असून सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट मिळणार आहे.

दिवाळीपूर्वीच या संदर्भात आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. या संदर्भात चालू असलेल्या घडामोडी विषयी सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार डी.ए वाढ

केंद्र सरकारने नुकतीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेल्या महागाई भत्ता वाढीची ज्ञापनाची कार्यालयीन्ञापनाची प्रत राज्य शासनाच्या वित्त विभागास मिळालेली आहे.

आता राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना 46% दराने महागाई भत्ता वाढी संदर्भात शासन निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.त्यानंतर राज्यातील सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा जुने पासून चार टक्के महागाई भत्ता वाढ देण्यात येऊन 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्व सरकारी,निमसरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लाभ माहे जुलै 2023 पासून फरकासह मिळणार आहे.

डी ए वाढ शासन निर्णय दिवाळीपुर्वीच 

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता हा देण्यात येणार असून, दिवाळीपूर्वीच या संदर्भात शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे पण वाचा ~  DA Hike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! आज महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय होणार ?

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक प्रकारे मोठा दिलासा मिळणार आहे. दिनांक 8 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर दरम्यान सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन त्याचबरोबर इतर मागण्यासाठी आंदोलनाच्या तयारीत असल्यामुळे त्यापूर्वी सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता वाढली आहे.

वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीनंतर राज्य सरकारमधील अखिल भारतीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढी संदर्भात कार्यालयीन व्यापाराची प्रत शासनाला प्राप्त झाली आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांच्याकडून सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवण्यात आल्या असून लवकरच केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता देण्याची मागणी यांच्याकडून करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा डीए महागाई भत्ता देण्यासंदर्भात कार्यालयीन प्रस्ताव तयार करण्याच्या हालचालीला सुरुवात झालेली असून,सदरील डीए वाढवा लागू करण्यासंदर्भात मंत्रालयात हालचालीला सुरुवात झालेली आहे.

Leave a Comment