Dearness Allowance : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट मिळालेली आहे. सदरील महागाई भत्ता वाढ हा 1 जानेवारी 2024 रोजी झालेल्या महागाई भत्ता वाढीच्या आधारावर देण्यात आलेला होता.
आता जुलै महिना संपत आला असल्याकारणाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट मिळणार आहे तर हा महागाई भत्ता किती वाढेल आणि केव्हा मिळेल प्रत्यक्ष लाभ याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.
AICPI-IW Index for Dearness Allowance
महागाई निर्देशकाच्या आधारे साधारणपणे वर्षातून दोन वेळेस कर्मचाऱ्यांना DA वाढीचे मिळते.जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढतो.
मित्रांनो, AICPI-IW निर्देशांक जानेवारीमध्ये 138.9 अंकांवर होता, ज्यामुळे महागाई भत्ता 50.84 टक्क्यांवर पोहोचला.फेब्रुवारीमध्ये निर्देशांक 139.2 अंकांवर, मार्चमध्ये 138.9 अंकांवर आणि एप्रिलमध्ये 139.4 अंकांवर राहिला. या धर्तीवर फेब्रुवारीमध्ये महागाई भत्ता 51.44 टक्के, तर मार्चमध्ये 51.95 टक्के आणि एप्रिलपर्यंत 52.43 टक्के झाला आहे.
तज्ज्ञांच्या मते, महागाई भत्त्यात (डीए) पुढील वाढ ३ टक्के असू शकते. थोडक्यात जुलै 2024 पासून 53 % दराने महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट दिले जाऊ शकते.
महागाई भत्ता वाढ व फरक
महागाई भत्ता वाढीस संदर्भात सरकारकडून सध्या तरी कोणती अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.जून 2024 च्या महागाई निर्देशांकाचे आकडे अजून पर्यंत आलेले नाही.
जून अखेरपर्यंत सर्व डेटा उपलब्ध झाल्यानंतर लेबर ब्युरो संबंधित फाइल अर्थ मंत्रालयाकडे पाठवली जाईल. त्यानंतर मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जाईल.
सदरील महागाई भत्ता वाढ ही 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे. साधारणपणे सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता व जुलै ते घोषणेच्या तारखेपर्यंतच्या महिन्यांची थकबाकी दिली जाईल.