Investment Tips : बरेच जण सध्याच्या काळात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय शोधत आहेत. मिञांनो अशा काही स्किम आहेत की यामध्ये अगदी कमी गुंतवणूक करून चांगला परतावा मिळू शकतो.
अशीच एक बचत योजना आहे ज्यामध्ये आपण फक्त एक कप चहाच्या किंमतीपेक्षा कमी पैशांची गुंतवणूक तुम्हाला दरमहा 5 हजार रुपयांचे पेन्शन देऊ शकते.
Old age pension plan
तुमचे वय 18 वर्ष असेल तर दररोज किमान 7 रुपयांची दरमहा गुंतवणूक सुरू केली तर तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा 5000 रुपये मिळू शकतात.या योजनेचे नाव आहे अटल पेन्शन योजना.
वयाच्या 18 वर्षे ते 40 वर्षांपासून गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत, 18-40 वर्षे वयोगटातील सर्व भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतात. ग्राहकांच्या मृत्यूनंतर, वारसदार व्यक्तीला पेन्शन दिली जाते. या योजनेत किमान 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल.
अटल पेन्शन योजना माहिती
अटल पेन्शन योजना केंद्र सरकार चालवते. ही हमी मासिक पेन्शन योजना आहे. त्याची सुरुवात 2015-16 मध्ये करण्यात आली. सदरील योजना कामगार आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. यामध्ये 1000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळते.
मासिक गुंतवणूक किती करावी लागेल?
PFRDA च्या तक्त्यानुसार,वयाच्या 25 व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर, आपल्याला मासिक 376 रुपये गुंतवावे लागतात.
आपले वय जर 30 वर्ष असेल तर 577 रुपये गुंतवावे लागतील. वयाच्या 35 व्या वर्षी 902 रुपये मासिक गुंतवणूक करायला सुरुवात केली तर आपण 5000 रुपये मासिक पेन्शन मिळण्यास पात्र व्हाल