Close Visit Mhshetkari

Arrears and Bonus : कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन आले शासन निर्णय ! एकास १० % टक्के वाढ तर एका संवर्गाला मिळणार ५ हजार रुपये ठोक भत्ता ..

Arrears and Bonus : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज दोन महत्त्वपूर्ण निर्णय करण्यात आलेले असून त्यामध्ये एका संवर्गातील कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दहा टक्के मानधन वाढ फरक मिळणार असून दुसऱ्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये प्रोत्साहन पूरक भत्ता मिळणार आहे तर काय आहेत निर्णय पाहूया

मानधन वाढ फरक मिळणार!

सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी सन २०००-२००१ पासून देशभरात झाली.सर्व शिक्षा अभियानांतर्गत पदांना मंजूरी देताना नवीन पदनिर्मिती करू नये तसेच निर्माण केलेली पदे केवळ कंत्राटी अथवा प्रतिनियुक्तीने भरण्यात यावीत.सदर पदे भरल्यामुळे सोसायटी अथवा राज्य शासनावर कायमस्वरूपी दायित्व येता कामा नये,असे नमूद केले आहे. आता या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.

या कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० % वाढ

समग्र शिक्षा योजनेंतर्गत सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात कार्यक्रम व व्यवस्थापनांतर्गत मंजूर कार्यरत कर्मचा-यांच्या मानधनात १०% वाढ करण्यास कार्यकारी समितीने मान्यता दिली आहे.

मात्र कार्यकारी समितीने दिलेल्या मान्यतेनुसार सदर कंत्राटी कर्मचा-यांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव केंद्रशासनास सादर करण्यात आला असता केंद्र शासनाने सदर प्रस्ताव अमान्य केला आहे. 

आता सन २०२०-२१ मध्ये प्रकल्प मान्यता मंडळाने निश्चित केलेल्या मानधनात वाढ होणार नाही.यास्तव, सदर कंत्राटी कर्मचा-यांच्या मानधनात होणाऱ्या वाढीचा आर्थिक भार राज्य शासनाने स्वतंत्ररित्या उचलावा,असे नमूद केले आहे.

समग्र शिक्षा,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांच्या सध्याच्या मानधनात १० टक्के वाढ करण्यास राज्य शासनाने शासन निर्णय दि.१८.०९.२०२३ अन्वये शासन निर्णयाच्या दिनांकापासून शासन मान्यता देण्यात आली आहे.

समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यकमातंर्गत करार पध्दतीने सद्यस्थितीत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ करण्यात आलेली आहे. सदर वाढीकरीता फरकाची रक्कम रु. १०,८३,१९,७३७/- इतका निधी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

आता यांना ५ हजार रूपये ठोक भत्त्या

मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरुप लक्षात घेता शासन आता असे आदेश देत आहे आहे की, मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभागातील (मंत्रालय खुद्द) लिपिक-टंकलेखक संवर्गास दरमहा रु.५०००/- (रुपये पाच हजार फक्त) इतक्या रक्कमेच्या ठोक भत्त्याचे प्रदानकरण्यास येणार आहे.

हे पण वाचा ~  Survey Mandhan : मोठी बातमी ! मराठा संरक्षण केलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन होणार बँक खात्यात जमा; परिपत्रक निर्गमित ...

१) मंत्रालयातील लिपिक-टंकलेखक हे संवर्गबाह्य बदलीने/ प्रतिनियुक्तीने अथवा कायमस्वरुपी नियुक्तीने इतर क्षेत्रिय कार्यालयात / जिल्ह्यात / विभागात गेल्यास त्यांना सदर दरमहा ठोक भत्ता अनुज्ञेय होणार नाही.

२) लिपिक-टंकलेखकास सहायक कक्ष अधिकारी पदावर स्थानिक/ नियमित पदोन्नती मिळाल्यास त्यानंतर लगतच्या महिन्यापासून सदर ठोक भत्ता अनुज्ञेय होणार नाही.

३) लिपिक-टंकलेखकाच्या रजा खाती देय व अनुज्ञेय रजा शिल्लक असल्यास संबंधित रजा कालावधीसाठी त्याला सदर ठोक भत्ता अनुज्ञेय राहील.

४) एका कॅलेंडर महिन्यात १५ दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी असाधारण रजा असल्यास त्या महिन्यात लिपिक- टंकलेखकास सदर ठोक भत्ता अनुज्ञेय होणार नाही.

५) निलंबन कालावधीसाठी सदर ठोक भत्ता अनुज्ञेय होणार नाही. तथापि, भविष्यात निलंबन कालावधी नियमित केल्यास सदर ठोक भत्ता संबंधितास अनुज्ञेय होईल. (निलंबन कालावधी १५ दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठीही असल्यास व सदर निलंबन कालावधी नियमित न झाल्यास, संबंधितांस सदर ठोक भत्ता पूर्ण महिन्यासाठी अनुज्ञेय होणार नाही.

६) लिपिक-टंकलेखक हा विभागीय सहायक कक्ष अधिकारी परीक्षा उत्तीर्ण होऊन, त्याची सहायक कक्ष अधिकारी पदावर नियुक्ती झाल्याच्या लगतच्या महिन्यापासून त्याला सदर ठोक भत्ता अनुज्ञेय होणार नाही.

(७) लिपिक-टंकलेखक संवर्गात सेवेत लागल्यापासून ज्या दिनांकास सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या तीन लाभाच्या योजनेनुसार १० वर्षाची नियमित सेवा पूर्ण होईल (वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होईल) त्यानंतर लगतच्या महिन्यापासून सदर ठोक भत्ता अनुज्ञेय होणार नाही.

८) संबंधित कार्यालयीन आदेश पारित झाल्यानंतर लिपिक-टंकलेखकास ठोक भत्त्याचे अतिरिक्त प्रदान झाल्यास, त्याची वसूली करण्यात येईल.सदर आदेश हा, शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या महिन्यापासून लागू करण्यात येत आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment