Close Visit Mhshetkari

NPS Benefits : काय आहे ‘नॅशनल पेन्शन योजना’; पहा कमी दिवसात गुंतवणूक करुन कसे व्हाल करोडपती !

NPS Benefits : नमस्कार मित्रांनो खाजगी क्षेत्रात नोकरी करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.मित्रांनो आपल्याला माहिती आहे की 2005 नंतर सरकारी सेवेत रुजू झालेले तसेच खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळत नाही.

National Pension Scheme Benefits

यासाठीच केंद्र सरकारने खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS सुरू केली आहे. खरोखरच खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार वर्गांसाठी एमपीएस म्हणजे म्हातारपणाचा आधार आहे. थोडी – थोडी गुंतवणूक करून आपण 50 हजार रुपये पर्यंत पेन्शन सेवा निवृत्ती नंतर मिळू शकतो, तर ते कसं हे आपण आलेखात पाहणार आहोत.

नॅशनल पेन्शन स्कीम मधील गुंतवणूक हे दीर्घकालीन स्वरूपाची आहे. यात मिळणाऱ्या नफा सेवानिवृत्तीनंतर वेतनाच्या स्वरूपात आपल्याला मिळत. या पेन्शन विषयी आणखी काही सांगायचं झाल्यास पगाराच्या 10 % रक्कम आपल्या एनपीएफ खात्यात जमा होते त्यानंतर सरकार सुद्धा मूळ वेतनाच्या 14% रक्कम आपल्या एनपीएस खात्यात जमा करते.

राष्ट्रीय पेन्शन योजना

राष्ट्रीय पेन्शन योजना 2004 मध्ये सुरू झाली असली तरी या योजनेचे लाभार्थी फक्त सरकारी कर्मचारी होते. 2009 पासून ते सर्व श्रेणीतील लोकांसाठी खुले करण्यात आले.

NPS योजनेअंतर्गत आपण आपल्या किंवा आपल्या कुटुंबातील पती-पत्नी मुलांच्या नावे खाते उघडू शकतो तर मला किमान 250 रुपये पासून गुंतवणूक करून योजनेचा लाभ घेता येतो.

हे पण वाचा ~  NPS Balance : आपल्या NPS खात्यातील रक्कम दोन मिनिटांत तपासा ऑनलाईन मोबाईलवर;

राष्ट्रीय पेन्शन योजना पात्रता

भारतीय नागरिक असावा, ज्याचे वय १८ ते ७० वर्षांच्या दरम्यान असणाऱ्या व्यक्तीस लाभार्थी होता येते. आपण NPS खात्यात मासिक किंवा वार्षिक गुंतवणूक करू शकतो.

NPS योजनेचे फायदे

एमपीएस योजनेत २ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळते. तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन NPS खाते उघडू शकता. मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदार त्यांच्या खात्यातून 60 % रक्कम काढू शकता. यासाठी कोणताही कर आकारला जाणार नाही.

NPS मध्ये दोन प्रकारची खाती आहेत. टियर-1 मधून, ६० वर्षांनंतरच पैसे काढता येईल.टियर-2 खाते बचत खात्यासारखे काम करते, येथून आपण आपल्या गरजेनुसार पैसे काढू शकतो.

NPS कॅल्कयुलेटर

तुम्ही दर महिन्याला ५ हजार रुपये गुंतवल्यास, ही गुंतवणूक ३० वर्षे चालू ठेवली तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर ६० वर्षांपर्यंत १० % परतावा मिळेल असे काही धरल्यास ६० वर्षांच्या वयानंतर NPS खात्यातील एकूण रक्कम १.१२ कोटी रुपये होईल.

नियमांनुसार, तुम्ही ६० वर्षांचे झाल्यावर तुम्हाला 67 लाख रुपये रोख मिळतील आणि दरमहा ४५ हजार रुपये पेन्शन मिळेल.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment