LIC Scheme : तुम्हाला एलआयसीच्या या योजनेमध्ये एकरकमी पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळणं सुरु होतं. ही पेन्शन तुम्हाला आयुष्यभर मिळत राहते. या स्किमला वयाच्या 40 वर्षापासून तर 80 वर्षांपर्यंत वापर करता येते.हा एक प्रकारचा सिंगल प्रीमियम पेन्शन प्लान आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि तुम्ही आयुष्यभर कमवू शकता
निवृत्तीनंतर स्वतःच्या खर्चाबाबत तुम्हाला विचार करण्याची गरज नाही कारण आता गुंतवणूकदरांची चिंता लक्षात घेत एलआयसी आपल्या ग्राहकांना अनेक प्रकरच्या पेन्शन योजनांचा लाभ मिळवून देते. यापैकी एक आहे – LIC सरल पेन्शन योजना. सरल पेन्शन योजना ही एक नॉन-लिंक्ड, सिंगल प्रीमियम, वैयक्तिक तत्काळ वार्षिकी योजना आहे. या योजनेत एकरकमी गुंतवणूक करावी लागेल. चला तर मग सरल पेन्शन योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ.
एकदा पैसे गुंतवून आयुष्यभर कमावू शकता
तुम्हीजर तुमच्या कुटुंबाच्या भविष्यातील आर्थिक समस्यांबद्दल विचार करत असाल तर आणि तु्हाला तुमच्या कुटंबियांची चिंता वाटत असेल आणि तुम्हाला कोणत्याही जोखमीशिवाय कमाई हवी असेल तर येथे आम्ही तुम्हाला भारतीय जीवन विमा महामंडळाची एल आय सी एक उत्तम योजनेबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत. येथे आम्ही तुम्हाला त्याच योजनेबद्दल सांगत आहोत, ज्यात तुम्ही एकदा पैसे गुंतवून आयुष्यभर कमावू शकता घेऊयात काय आहे ती योजना.
LIC Saral Pension yojana
देशातील सर्वात मोठी सरकारी लाइफ इन्शुरन्स कंपनी भारतीय जीवन विमा निगममध्ये प्रत्येक वयोगटासाठी एक पॉलिसी उपलब्ध आहे. वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शनसंबंधीत अनेक एलआयसी योजना आहेत. पण तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षानंतरच पेन्शन मिळणं सुरु झालं तर काय होईल? एलआयसीची एकअशीच योजना आपल्या ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे. ही योजना म्हणजे एलआयसीची सरल पेन्शन योजना. योजनेमध्ये तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षामध्ये पेन्शनचा पूर्ण पणे लाभ घेऊ शकता
LIC Saral scheme benifits
डेथ बेनिफिट: पॉलिसी धारकाच्या नामनिर्देशित व्यक्तीला एकल जीवन वार्षिकी अंतर्गत मृत्यू झाल्यास त्याच मृत्यू लाभ देतो.
जॉइंट-लाइफ एन्यूइटीच्या : पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास एन्यूइटी जोडीदारासोबत सुरू राहते. जर दोघेही जिवंत नसतील तर, नॉमिनीला गुंतवलेल्या रकमेच्या 100 टक्के रक्कम मिळेल
सर्व्हायव्हल बेनिफिट: प्लॅन सर्व्हायव्हल बेनिफिट अंतर्गत विमाधारकाला एन्यूइटी रक्कम ऑफर करते
कर्जाचा लाभ: योजना सुरू केल्याच्या 6 महिन्यांनंतरही कर्ज मिळू शकते
फ्री-लूक कालावधी: 15 ते 30 दिवसांच्या फ्री-लूक कालावधीसहपॉलिसी खरेदी केल्याच्या तारखेपासून योजना उपलब्ध आहे ज्या दरम्यान पॉलिसीधारक तिला/तिला आवडत नसल्यास योजना नाकारू शकते.
कर लाभ: विमाधारक विद्यमान आयकर कायद्यांतर्गत कर लाभ देखील घेऊ शकतात.