LPG Cylinder Price : केंद्र सरकारने घरगुती गॅस ग्राहकांना अनेक महिन्यानंतर मोठा दिलासा दिला.गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त झाला.
मध्य प्रदेश सरकारने तर त्यापेक्षा पुढचे पाऊल टाकले आहे. उज्ज्वला गॅस धारकांना तर श्रावण आणि रक्षाबंधना निमित्त गॅस सिलेंडर अवघ्या 450 रुपयांत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
LPG Gas Cylinder ptice updates
गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या (किंमतींनी घराचे बजेट कोलमडले आहेत. एरव्ही 400-450 रुपयांना मिळणारे गॅस सिलेंडर थेट 1100 रुपयांच्या घरात पोहचले आहे.या दरवाढीमुळे गृहिणी संतापल्या आहेत.
केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरची 200 रुपयांनी कपात केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरवर सरकारने 200 रुपये सबसिडी जाहीर केली आहे.उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे.
उज्ज्वला योजनेंतर्गत LPG cylinder च्या किमती 200 रुपयांनी स्वस्त होतील. पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
गॅस सिलेंडर सबसिडी मिळणार
गॅस सिलेंडरच्या किंमती अजून कमी असाव्यात अशी ग्राहकांची मागणी केली जात होती.उद्यापासूनच हे नवे दर लागू होणार आहे. सध्या एक तर आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किमती कमी झाल्या आहेत.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आगामी निवडणुका होणार आहेत. जसे की,डिसेंबरमध्ये ५ राज्यांमध्ये निवडणुका आहेत, तर एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.