Close Visit Mhshetkari

7TH PAY COMMISSION : मोठी बातमी.. लोकसभा आचारसंहिता चालू असताना ‘ या ‘ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला …

7TH PAY COMMISSION : सध्या देशासह राज्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुकांची बिगुल वाजलेले आहे अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकार कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठे पावले उचलत आहेत.ज्याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत.

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती.अनेक राज्याने महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आचारसंहिता लागल्यामुळे काही राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली नव्हती.

7th Pay Dearness Allowance hike

आता निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा खालील राज्यांनी डीए मध्ये वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारची ही मोठी घोषणा मानली जात आहे.

सुधारित महागाई भत्तेचा फायदा राज्य कर्मचाऱ्यांना होणार असून 1 जुलै 2023 पासून सदर महागाई भत्ता लागू होणार आहे याची अधिकृत घोषणा सुद्धा सरकारने केली आहे. यासोबतच थकीत महागाई भत्त्याचा फरक सुद्धा रोखीने देण्यात येणार आहे.

हे पण वाचा ~  New pay commission : मोठी बातमी... या सरकारी कर्मचाऱ्यांना होणार नवीन वेतन आयोग लागू !शासन निर्णय निर्गमित ...

सरकारने एवढ्या टक्केवारीत डीए वाढवला

त्रिपुरा राज्य सरकारने मोठी घोषणा करत डीए वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.राज्याचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी अलीकडेच 1 जानेवारी 2024 पासून राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 5 % अधिक DA जाहीर केला आहे.

आता महागाई भत्ता वाढीमुळे सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या महागाई भत्ता 25% झाला आहे. त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री माणिक साहा यांच्या म्हणण्यानुसार, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दरवर्षी हा 5 % DA देण्यासाठी सुमारे 500 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

राज्य सरकारच्या निर्णयाचा राज्यातील सुमारे 82 हजार पेन्शनधारक आणि 1,06,932 कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. सदरील घोषणा महागाईत बूस्टर डोससारखी ठरणार आहे.

Leave a Comment