PAN Card : पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून होती. या तारखेपर्यंत पॅन लिंक न केल्यास, तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. म्हणजेच तुम्ही अनेक आर्थिक गोष्टी करू शकणार नाही. येथे पैशांशी संबंधित 15 गोष्टी आहेत, ज्या तुम्ही करू शकणार नाही.
पॅन काम करत नसल्यामुळे अशा लोकांची एक-दोन नव्हे, तर 15 कामे अडकणार आहेत. यातील अनेक गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. गुंतवणूक, कर्ज आणि व्यवसायाशी संबंधित अनेक गोष्टी पॅनशिवाय करू शकणार नाहीत.
USE of pan card
केंद्र सरकारने कर चोरी शोधण्यासाठी पॅनकार्ड सुरु केले. करदात्यांची गुंतवणूक, कर्ज आणि इतर व्यावसायिक घटनांचा रेकॉर्ड त्यामुळे सरकार दरबारी नोंदवल्या जातो. त्यासाठी पॅनकार्ड क्रमांकाचा उपयोग होतो. अनेक आर्थिक बाबींचा ट्रॅक रेकॉर्डसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. देशात विना पॅन कार्ड मोठा व्यवहार करता येत नाही.
आपल्या पॅन कार्डची वैधता तपासण्यासाठी-
- आयकर विभागाच्या ई-फाईलिंग वेबसाइटला – incometaxindiaefiling.gov.in/homeभेट द्या.
- पृष्ठाच्या डाव्या बाजूला “व्हेरिफाय युअर पॅन डिटेल्स” लिंकवर क्लिक करा.
- दिलेल्या फील्डमध्ये आपला पॅन नंबर प्रविष्ट करा.
- पॅन कार्डवर नमूद केल्यानुसार आपले पूर्ण नाव प्रविष्ट करा.
- पृष्ठावर दिल्यानुसार आता कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
- “सबमिट” बटणावर क्लिक करा.
- वेबसाइट सक्रिय आहे की नाही हे आपल्या पॅनकार्डची स्थिती दर्शविणारा संदेश प्रदर्शित करेल.
कोणती कामं करता येणार नाहीत?
- आयकर विभागाच्या वेबसाइटनुसार, निष्क्रिय पॅन असलेली व्यक्ती आर्थिक व्यवहार करू शकत नाही.
- बँकिंग कंपनी किंवा सहकारी बँकेत खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही.
- क्रेडिट किंवा डेबिट कार्ड जारी करण्यासाठी अर्ज करू शकणार नाही.
- डिपॉझिटरी, भागीदार, सेबी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडे डिमॅट खाते उघडू शकत नाही.
- कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटला एकावेळी 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम देऊ शकणार नाही.
- परदेशात प्रवास करण्यासाठी किंवा कोणतेही विदेशी चलन खरेदी करण्यासाठी 50,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे देऊ शकणार नाहीत.
- युनिट खरेदीसाठी 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम म्युच्युअल फंडाला दिली जाऊ शकत नाही.
- कंपनी किंवा संस्थेने जारी केलेले डिबेंचर्स किंवा बाँड्स मिळविण्यासाठी 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली जाणार नाही.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बाँड्स मिळवण्यासाठी 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरली जाऊ शकत नाही.
- कोणत्याही बँक किंवा NBFC मध्ये रोख ठेवी एका दिवसात 50,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाहीत.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.