Close Visit Mhshetkari

Loan Fraud : आपल्या नावावर किती कर्ज आणि क्रेडिट कार्ड आहेत? असे जाणून घ्या …

Loan Fraud : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग फार जवळ आलेला आहे त्यातच डिजिटल युगमुळे अनेक गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. याचा गैरफायदा घेणारे सुद्धा लोक जगामध्ये अनेक आहेत. त्यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे परिणामी सायबर गुन्ह्याचे प्रमाण देखील वाढले आहे. Credit Card and Loan Fraud

मित्रांनो सायबर गुन्हेगार फसवून फसवणुकीसाठी वेगवेगळ्या तंत्रांचा आणि मार्गांचा अवलंब करत असतात, हे प्रकार रोखण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलले आहेत. सध्या एका फसवणुकीच्या प्रकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. एखाद्या व्यक्तीच्या नावावर कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळवतात.

आता आपल्या नावावर एखादं क्रेडिट कार्ड किंवा कर्ज घेतलेले आहे हे कसं तपासायचं आणि या संदर्भात तक्रार कशी करायची या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

तुम्ही तुमच्या नावावर किती कर्ज किंवा क्रेडिट कार्ड जारी केले आहेत हे सहज तपासू शकता.तुमच्या नावावर किती कर्ज किंवा क्रेडिट कार्ड आहेत?आपल्या नावावर किती कर्ज किंवा किती क्रेडिट कार्ड आहे, ही माहिती बघण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. आपला सिबिल स्कोर तपासावून आपण आपल्या नावावर असलेल्या कर्जाची सर्व माहिती दोन मिनिटात पाहू शकतो.

How To Check CIBIl Score

CIBIL.com, Paytm यासारख्या अनेक अॅप्सवर तुम्ही credit Score मोफत तपासू शकता.

तुमचा CIBIL स्कोर कसा तपासायचा?

हे पण वाचा ~  Credit Card rules : तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर लक्षात ठेवा हे नियम नाहीतर भरावा लागेल चार्ज

CIBIL स्कोर हा तुमच्या कर्जाच्या इतिहासाचे प्रतिनिधित्व करणारा एक महत्त्वाचा आकडा आहे. हा स्कोर बँका आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्थांद्वारे तुमच्या क्रेडिटयोग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी वापरला जातो. CIBIL स्कोर 300 ते 900 च्या स्केलवर असतो, 750 पेक्षा जास्त स्कोर हा चांगला मानला जातो.

तुमचा CIBIL स्कोर तपासण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

1. CIBIL च्या https://www.cibil.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

2. होम पेजवर “Get Your Free CIBIL Score” पर्यायावर क्लिक करा.

3. तुमचे नाव, ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

4. लॉग इन केल्यानंतर, तुमचा आयडी प्रूफ निवडा: पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट.

5. तुमचा पिन कोड, जन्मतारीख आणि मोबाइल नंबर टाका.

6. “Accept and Continue” बटणावर क्लिक करा.

आपल्या नावावर असलेले क्रेडिट कार्ड व कर्ज येथे पहा 

➡️➡️ Credit Score ⬅️⬅️

7. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल. तो OTP टाका आणि “Verify” बटणावर क्लिक करा.

8. तुमच्या फोनवर एक मेसेज येईल ज्यामध्ये तुमचा CIBIL स्कोर आणि तुमच्या नावावरील क्रेडिट इतिहास असेल.

फसवणूक झाल्यास काय करावे?

आपण आपल्या CIBIL स्कोअरमध्ये काही गडबड आढळल्यास, क्रेडिट ब्युरो आणि क्रेडिट ग्रँटिंग कंपनीशी संपर्क साधावा. आपण त्यांना ही समस्या लवकरात लवकर दुरुस्त करण्यास सांगू शकता.

Leave a Comment