Public Holidays : राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या दिवाळीच्या सुट्टी संदर्भात महत्त्वाचे शासन परिपत्रक आज निर्गमित करण्यात आलेले असून राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांसाठी सुट्टीच्या संदर्भात समानता येण्यासाठी शासनाने निर्देश दिलेले आहेत तर बघूया सदरील परिपत्रकानुसार दिवाळी सुट्टी नियोजन कसे असेल
Diwali vacation 2023 for school
सन २०२३-२४ मधील दिपावली सुट्टयांबाबत राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये (शिक्षण विभाग) मध्ये समानता येण्यासाठी आपल्या स्तरावरून दि.१.११.२०२३ ते २५.११.२०२३ कालावधीत दिवाळीची सुट्टी जाहीर करणेबाबत शासन परित्रक निर्गमित करण्यात आले आहे.
शिक्षण उपसंचालक (प्रशासन) शिक्षण आयुक्तालय, पुणे यांच्याकडून मा.शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, मध्यवती इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे, आणि मा. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना पत्राद्वारे कळविले आहे.
दिवाळी सुट्टी नवीन शासन परिपत्रक येथे डाऊनलोड करा
दिवाळी सुट्टी शासन परिपत्रक
सदर प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केल्यानुसार दिवाळांच्या सट्टीबाबत राज्यातील शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याचे निदर्शनास आणून दिलेले आहे तरी याबाबत शासनाच्या प्रचलित निर्देशानुसार कार्यवाही करून संबंधिताना कळविण्यात येणार आहे.
- आता राज्यातील सर्व शाळा व महावद्यालयांना दिवाळी सुट्टी दिनांक 09/11/2023 ते 25/11/2023 राहणार आहे.
- दिनांक 26/11/2023 रोजी रविवार व दिनांक 27/11/2023 रोजी गुरु नानक जयंती असल्याने दिनांक 28/11/2023 पासून शाळा सुरु होतील.