Close Visit Mhshetkari

Home Loan Tips : तुम्ही स्वतःचे घर विकत घेण्याचा विचार करत आहात काय? होमलोन बाबत या गोष्टी लक्षात ठेवा !

Home Loan Tips :- RBI च्या म्हणण्यानुसार, जानेवारी ते मार्च 2023 च्या दरम्यान घराच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाले आहे या काळात घरांच्या किमतीमध्ये 4.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एवढेच नाही तर घरात घरांच्या मागण्या किमतीमध्ये यापुढे सुद्धा वाढ होण्याचे ट्रेंड कायम राहणार असल्याचे RBI कडून स्पष्ट करण्यात आलेला आहे.

घर घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असतो गृह कर्ज तर हे ग्रुप कर्ज घेताना कोणकोणत्या बाबींचा विचार करावा याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

Home loan Interest Rate

मित्रांनो बँकांच्या एकूण कर्जामध्ये गृह कर्जाचा वाटा अकरा वर्षांपूर्वी 8.6 % होता, आता जवळपास 14% पर्यंत गृह कर्ज बँकांनी वितरित केलेले आहे.ज्यावरून असे दिसून येते की लोक घर खरेदी करण्यासाठी गृहकर्जाच्या पर्यायाकडे जात आहेत.

अशा परिस्थितीत आपण जर घर करण्याच्या खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर खालील गोष्टींची काळजी करणे आपल्याला महत्त्वाचे ठरणार आहे तर चला पाहूया होम लोन संदर्भात महत्त्वाच्या टिप्स.

हे पण वाचा ~  Pre-approved Loan साठी फोन किंवा मेसेज आलाय? थांबा.. आधी वाचा,पहा ते घेणे किती सुरक्षित?

Cibil score : आपला सिबिल स्कोर गृह कर्जासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असतो.क्रेडिट स्कोअर 750-800 च्या दरम्यान असेल तर तुम्ही home loan घेण्याचा विचार करू शकता. कारण, या क्रेडिट स्कोअरमुळे तुम्हाला आकर्षक दरात गृहकर्ज मिळू शकते.

Persanal – car loan : आपण जर या अगोदरच पर्सनल लोन किंवा इतर लोन घेतलेले असेल तर घर कर्ज घेण्याचा विचार शक्यतो लांबणीवर टाकावा जेणेकरून गृह कर्जा घेताना EMI बोजा आपल्यावर पडणार नाही.

Down Payment :- जर तुमच्याकडे डाऊन पेमेंटसाठी 20-30 % कॅश असेल तर घर खरेदी करण्यास आपल्याला काहीच अडचण येणार नाही त्यामुळे सहज आपण गृह कर्ज घेऊ शकता.

Desclemer : गृह कर्ज संबंधित सर्व माहिती आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.

Leave a Comment