Income Tax Act : राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS धारक कर्मचाऱ्यांना प्राप्तिकर कायद्यामधील कलम 80C खूप महत्त्वाचे आहे.आपल्याल याचा फायदा कसा मिळणार ?
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की यावर्षी आपण आयकर भरताना जुनी करप्रणाली किंवा नवीन कर प्रणाली यापैकी कोणत्याही एका प्रणालीचा उपयोग करू शकणार आहात. अशा वेळी जुन्या करप्रणालीमध्येच आपल्याला 80 C अंतर्गत विविध कर सवलती देण्यात आलेल्या आहेत.याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
Income Tax Act Section 80C
आयकर कायद्याचे कलम 80C तुम्हाला अनेक प्रकारे कर बचत करण्यास मदत करते. याच्या मदतीने आपण एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतची आयकर सूट मिळवू शकतो. वैयक्तिक करदाते आणि HUF (हिंदू अविभक्त कुटुंब) याचा लाभ घेऊ शकतात. चला तर मग आपण समजून घेऊया की, कलम 80C काय आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा घेता येऊ शकतो.
Section 80 C :- या कलमा अंतर्गत तुम्हाला EPF आणि PPF यांसारख्या भविष्य निर्वाह निधीमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर कर सूट मिळू शकते. याशिवाय लाइफ इन्शुरन्स प्रीमियम, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम, होम लोन, सुकन्या समृद्धी योजना, NSC आणि SCSS देखील या कक्षेत येतात.
NPS Holder Income Tax Calculator
- Section 80 CCC :- राष्ट्रीय पेन्शन योजना आणि म्युच्युअल फंडांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर या कलमा अंतर्गत आयकर सूट मिळवू शकतो.
- Section 80 CCD (1) :- सदरील कलमाअंतर्गत नॅशनल पेन्शन सिस्टम आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या सरकारी पाठिंबा असलेल्या योजनांमधील गुंतवणुकीवर तुम्हाला आयकर सूट मिळत असते.
- Section 80 CCD (B1) :- सन 2005 नंतर सेवेत रूजू कर्मचाऱ्यांना NPS योजना लागू आहे. या कलमा अंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतच्या योगदानाला सूट देण्यात आली आहे.
- Section 80 CCD (2) :- NPS मधील रोजगार प्रदात्याचा वाटा या कलमांतर्गत सूट मिळण्यास पात्र आहे.आता आम्ही तुम्हाला अशाच काही पर्यायांची माहिती देणार आहोत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही कर सूट मिळवू शकता.