DA hike : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली असून, आपल्याला माहिती असेल की राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली असून एक जुलै 2023 पासून 46 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.
जॉईन व्हॉट्सॲप गृप 👉 |
महागाई भत्ता वाढ शासन निर्णय
सदरील महागाई भत्ता माहे नोव्हेंबर 2023 च्या वेतनात अदा करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता , परंतु तोपर्यंत सदरील महिन्याचे वेतन फॉरवर्ड झाले, असल्याकारणाने महागाई भत्ता नोव्हेंबर महिन्यात आता झाला नव्हता.
आता हा महागाई भत्ता डिसेंबर महिन्यात अदा करण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. माहे डिसेंबर 2023 च्या वेतनामध्ये चार टक्के महागाई भत्ता सह जुलै ते नोव्हेंबर 5 महिन्याचा फरक सुद्धा अदा करण्यात येणार आहे.
Da hike calculator
सर्व राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक ०१ जुलै २०२३ पासून सुधारणा करण्याबाबत शिक्षण उपसंचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१ यांच्या कडून विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग, सर्व,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद,सर्व महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य ,अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक) यांना शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित करण्यात केले आहे.
वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक २३/११/२०२३ नुसार वित्त विभागाचे संदर्भाधिन दिनांक २३/११/२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये सुधारित महागाई भत्त्यामध्ये सुधारणा व अनुज्ञेय महागाई भत्याची थकबाकी देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे.