PVC Aadhaar Card : आजकाल बरेचलोक PVC आधार कार्ड वापरतात.नवीन PVC कार्ड अगदी atm किंवा credit कार्डसारखे दिसते,जे तुम्ही तुमच्या खिशात सहज वापरू शकता. UIDAI च्या मते, नवीन PVC कार्डची छपाई आणि लॅमिनेशनची गुणवत्ता चांगली आहे.
आता हे पीव्हीसी आधार कार्ड ऑनलाइन कसे ऑर्डर करायचे याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
PVC Aadhaar Card Download
- सर्वप्रथम UIDAI ची अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- ‘माय आधार’ विभागात जा.
- ‘ऑर्डर आधार PVC Card’ वर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक किंवा EID टाका
- 12 अंकी आधार क्रमांक, 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी EID टाका.
- सुरक्षा कोड किंवा कॅप्चा टाका.
- ‘Send OTP’ वर क्लिक करा.
- OTP टाका आणि सबमिट करा
- नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP मिळेल.
- OTP टाकून ‘Submit’ बटनावर वर क्लिक करा.
- PVC Card ची प्रिव्ह्यू कॉपी पहा.
- आधारशी संबंधित PVC Card ची प्रिव्ह्यू कॉपी दिसेल.
जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर
- ‘विनंती OTP’ समोर दिलेल्या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन मोबाइल नंबर टाका.
- ‘तुम्हाला OTP पाठवा’ बटणावर क्लिक करा.
- आता 50 रूपये फी पेड करण्यासाठी पेमेंटचा पर्याय निवडा.
- डिजिटल माध्यमांद्वारे ₹50 भरा.
Online PVC Aadhaar Card
आपले PVC आधार कार्ड मागवले जाईल.15 दिवसात स्पीड पोस्टद्वारे घरी पोहोचेल.सुरक्षिततेसाठी नवीन कॉर्डमध्ये होलोग्राम, गुइलोचे पॅटर्न,घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स्ट फीचर्स देण्यात आले आहेत.क्यूआर कोडद्वारे कार्डची सत्यता त्वरित पुष्टी केली जाऊ शकते.PVC आधार कार्डसाठी ₹50 शुल्क आहे.PVC कार्ड 5 वर्षांसाठी वैध आहे.
UIDAI ची अधिकृत वेबसाइट :- https://uidai.gov.in
UIDAI चा हेल्पलाइन नंबर :- 1947
आपले PVC Aadhar Card येथे डाऊनलोड करा