Sip Calculator : मित्रांनो आपल्याला माहिती आहे सद्यस्थितीमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढत असून पगारदार वर्ग एसआयपी मध्ये गुंतवणूक करत आहे तर Sip म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे म्युच्युफल फंडात सहज गुंतवणूक केली जाऊ शकते.
Top-Up Sip Formula
मित्रांनो सर्वसाधारण एसआयपीमध्ये आपण गुंतवणूक करत असालच परंतु आज आपण एक खास सुविधा विषयी माहिती बघणार आहोत. ज्यामध्ये एसआयपी मध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला अतिरिक्त फायदा होऊ शकतो. Top Up SIP पर्याय देखील आता म्युचल फंडामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.ज्याद्वारे तुम्ही सध्या चालू असलेल्या एसआयपी मध्ये काही प्रमाणात वाढ करू शकता.
SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक लोकप्रिय मार्ग आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा दीर्घकालीन संपत्ती वाढवण्याचा एक फायदेशीर पर्याय असून ठराविक रक्कम दरमहा गुंतवणूक करता येते अलीकडच्या काळात म्हणजेच ऑक्टोबर 2023 मध्ये 16928 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक एस आय पी द्वारे म्युच्युअल फंडात करण्यात आलेली आहे.
SIP Investment Planning
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आपण आपल्या पगारातील धर्मा ठराविक रक्कम एसीपी मध्ये गुंतवणूक करू शकतो त्याचबरोबर ती माहिती सहामाही आणि वार्षिक पद्धतीने सुद्धा आपण एसआयपी मध्ये गुंतवणूक करू शकतो.
आपल्याला यामध्ये वाढ करायची असल्यास हा पर्याय बहुतेक लोकांना माहिती नाही,परंतु एसआयपी सुरू करते वेळेस वार्षिक वेतन वाढीबरोबरच आपण एसआयपी मध्ये ठराविक रक्कम म्हणजे साधारणपणे 10% पर्यंत रक्कम सुद्धा वाढवू शकतो.
टॉप-अप SIP म्हणजे काय?
आपण जर दरमहा दहा हजार रुपयाची एसीपी मध्ये गुंतवणूक करत असल्यास आपल्याला किती परतावा मिळेल याविषयी कॅल्क्युलेटर च्या आधारे आपण सविस्तर माहिती बघूया त्यामध्ये साधी एसआयपी आणि टॉप-अप एसआयपी याची तुलना केलेली आहे.
- मासिक SIP : १० हजार रुपये
- कालावधी : २० वर्षे
- अंदाजे परतावा : १२%
- एकूण गुंतवणूक : २४ लाख रुपये
- २० वर्षांनंतर SIP परतावा : सुमारे १ कोटी रुपये (९९.९१ लाख)
- अंदाजे नफा : ७५.९१ लाख रुपये
Top-Up SIP Calculator
- प्रारंभिक मासिक SIP: १० हजार रुपये
- कालावधी :- २० वर्षे
- अंदाजे परतावा :- १२%
- प्रत्येक एक वर्षाने टॉप-अप : – १०%
- एकूण गुंतवणूक : – ६८.७३ लाख रुपये
- २० वर्षानंतर SIP परतावा : – दोन कोटी रुपये (१.९९ कोटी) अंदाजे नफा : – १.३० कोटी रुपये