Close Visit Mhshetkari

Home Loan Interest Rate : सणासुदीपूर्वी या बँकेच्या ग्राहकांना पुन्हा एकदा झटका ! व्याजदर वाढवले; होमलोन, कार लोन महागणार

Home Loan Interest Rate : देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीनं सणासुदीपूर्वीच ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. एचडीएफ बँकने काही मुदतीच्या कर्जावरील व्याजदरात वाढ जाहीर केलीये.

सणासुदीपूर्वीच आता HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.बँकेने MCLR 10 बेसिस पॉइंट्स म्हणजेच 0.10 % वाढ केली आहे. बँकेचा MCLR वाढवल्याने गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जासह सर्व प्रकारच्या फ्लोटिंग लोनचा हप्ता वाढणार आहे.

नवीन व्याज दर लागू होणार!

आरबीआयने नुकतेच आपला रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु एचडीएफसी बँकेने MLCR मध्ये 0.10 पॉइंट वाढ केल्यामुळे आपल्या कर्ज हप्त्यावर परिणाम होणार आहे.

एमएलसीआर निश्चित करताना डिपॉझिट रेट, रेपो रेट, ऑपरेशनल कॉस्ट आणि कॅश रिझर्व्ह रेशो बनवण्याच्या कॉस्टचा समावेश असतो.एचडीएफसी बँकेच्या वेबसाईटनुसार नवे एमएलसीआर दर ७ ऑक्टोबर २०२३ पासून लागू करण्यात आलेत.

हे पण वाचा ~  Home loan Agrim : मोठी बातमी ! राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरबांधणी संदर्भांत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित ...

HDFC Bank Loan Interest Rate

  • HDFC Bank चा ओव्हरनाइट MLCR मध्ये १० बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली असून तो आता ८.६० % झालाय.
  • एका महिन्याच्या MLCR मध्ये १५ बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आलीये. यानंतर तो ८.५५ % वरून ८.६५ % झाला.
  • तीन महिन्यांच्या MLCR मध्ये १० बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली असून तो ८.८० % झालाय.
  • सहा महिन्यांच्या MLCR मध्ये ५ बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली असून तो ९.१० % झालाय.
  • एका वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी MLCR ९.२० % करण्यात आला.
  • दोन आणि तीन वर्षांच्या MLCR मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून तो अनुक्रमे ९.२० % आणि ९.३० % आहे.

MLCR मध्ये वाढ केल्यानं होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोनसह याच्याशी निगडीत सर्व प्रकारची लोन महागणार आहेत. यामुळे ग्राहकांना आता पूर्वीच्या तुलनेत अधिक EMI द्यावा लागणार आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment