Central employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे.केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यातील आपल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन त्याचबरोबर बोनसची घोषणा केलेली आहे तर बघूया या संदर्भात सविस्तर माहिती.
ओणम व गणेशोत्सवापुर्वी मिळणार पगार!
महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो.ओणम हा केरळमधील लोकप्रिय सण आहे.ओणम आणि गणेश चतुर्थी लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र आणि केरळ राज्यात सध्या कार्यरत असलेल्या केंद्र सरकारच्या औद्योगिक कर्मचाऱ्यांचे वेतन सुद्धा खालील तारखांना आगाऊ स्वरूपात देण्यात येण्याच्या संदर्भात अर्थमंत्र्यांनी मंत्रालयाने स्पष्ट केलेले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र आणि केरळमधील सर्व बँकांना तसे निर्देश देण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने रिझर्व बँकेला दिलेली आहे.
या कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस
केरळ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केरळ सरकारने 4000 रुपये बोनस ची घोषणा केलेली असून बोनस साठी पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना 2750 रुपये सण-उत्सव भत्ता म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे.
सदरील निर्णयाचा फायदा राज्यातील १३ लाख कर्मचारी व कामगारांना होणार आहे. सेवानिवृत्ती वेतनधारक व अंशदा पेन्शन योजनेंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये उत्सव भत्ता देण्यात येणार आहे.याबरोबरच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सण आडवांस म्हणून 20 हजार रुपये सुद्धा घेता येणार आहे.
राज्य कर्मचारी वेतन अपडेट्स
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार केरळ मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑगस्टचे आगाव वेतन तर महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यातील आगाव वेतन मिळणार आहे.
साधारणपणे 25 ऑगस्ट पूर्वी केरळ मधील सरकारी कर्मचाऱ्यांना तर बुधवार 27 सप्टेंबर पूर्वी महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ स्वरूपात वेतन मिळणार आहे.
आता केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणेच महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा गणेशोत्सवा दरम्यान आगाऊ स्वरूपात वेतन मिळते का ? पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.