Close Visit Mhshetkari

Income tax slab : पगारदार व्यक्तीसाठी कोणती आयकर प्रणाली उपयुक्त ? पहा २०२४-२५ आयकार कायद्यातील नियम व तरतुदी ..

Income tax slab : मा.अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आपल्या २०२३ मधील अर्थसंकल्पात जुन्या स्किममध्ये आयकराच्या करमाफ उत्पन्न मयदित व आयकर दरात काहीही बदल केला नसून आर्थिक वर्ष २०२३-२४ करीता करदात्यासाठी आयकराची मर्यादा व दर खालील प्रमाणे आहेत. तसेच नवीन स्किममध्ये यावर्षी आयकरामध्ये खालीलपैकी सूट दिली आहे.

New Income Tax Slabs (नवीन करप्रणाली)

नवीन करप्रणालीनुसार 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. Income tax स्लॅबची संख्या सहावरून पाचवर आणण्याची घोषणा करण्यात आली आहे.आता 9 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर केवळ 45 हजार रुपयाचा तर 15 लाखाच्या वार्षिक उत्पन्नावर 1.5 लाख रुपयांचा आयकर भरावा लागणार आहे.

  • 0 ते 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नवार – 0 टक्के
  • 3 ते 6 लाखांपर्यंतच्या उत्पन्नवार – 5 टक्के
  • 6 ते 9 लाखांपर्यंतच्या उत्पन्नवार – 10 टक्के
  • 9 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नवार – 20 टक्के
  • 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर – 30 टक्के 

Standard Deduction Benefits

जर तुमचे उत्पन्न 7 लाखांच्या आत असेल तरच तुमचे उत्पन्न करमुक्त असेल.म्हणजे 3 लाखांपासूनच्या उत्पन्नावर 5% टॅक्स लावण्यात आला आहे.पण नवीन कर प्रणालीमध्ये 50 हजार रुपयांच्या वजावटीचा समावेश करण्यात आला आहे.

Income tax old slab

  •  0 ते 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले नोकरदार करमुक्त असतील.
  • 2.5 ते 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 5 टक्के
  • 5 ते 7.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 10  टक्के
  • 7.5 ते 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 15 टक्के
  • 10 ते 12.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 20 टक्के
  • 12.5 ते 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 25 टक्के 
  • 15 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 30 टक्के

पगारी उत्पन्नातून मिळणाऱ्या वजावटी  

घरभाडे भत्ता : कलम १० (१३ ए) स्वतःच्या मालकीचे राहते घर नसलेल्या व एकूण वार्षिक पगाराच्या १०% पेक्षा जास्त घरभाडे देणाऱ्या कर्मचाऱ्याचा परभाडे भत्ता जास्तीतजास्त मिळणाऱ्या घरभाडे भत्याइतका कमी होऊ शकतो. त्यासाठी भाडे 

प्रमाणित वजावट : कलम १६: प्रमाणित वजावट ₹ ५०,०००/- किंवा मिळालेला पगार यापैकी कमी असलेली रकम स्टॅण्डर्ड पावती लागेल, तसेच परमालकाचे पॅन क्रमांक ही यावा लागेल.डिडक्शन म्हणून दोन्ही स्किममध्ये वजावटीस पात्र आहे.

व्यवसाय कर : कलम १६ (iii) प्रत्यक्ष भरलेल्या व्यवसाय कराची संपूर्ण वजावट या कलमाखाली मिळेल.

घरबांधणी/खरेदी कर्जावरील व्याज : कलम २४ (१) (vi): बँका/को-ऑप. बँका यांचेकडून घेतलेल्या दोन घरासाठीच्या गृहकर्जावरील व्याजाला र २ लाखांची वजावट मिळेल. तसेच घरदुरुस्तीसाठी किंवा टॉपअप कर्ज घरासाठी घेतले असल्यास र ३०,०००/- ची वजावट मिळेल.

हे पण वाचा ~  Income Tax Notice : या 5 प्रकारच्या व्यवहारावर इन्कम टॅक्स विभागाकडून मिळू शकते नोटीस!

गुंतवणूकीवरील वजावट (कलम ८० सी) : प्रॉ. फंड, कर बचत म्युच्युअल फंड, विमा हप्ता, पी.पी.एफ., एन.एस.सी., पायाभूत उद्योगाचे बाँड, नाबार्ड बाँड, शैक्षणिक फिजू, पेन्शन फंडात केलेली गुंतवणूक, सुकन्या समृद्धी योजना, घरासाठी पेतलेल्या कर्जाची परतफेड, शेडयूल्ड / नॅशनल बँकेत ५ वर्षांकरिता केलेली मुदत ठेव.इ.मध्ये गुंतवणूक / खर्च केल्यास त्याचीउत्पन्नातून वजावट मिळते.

आयकर नियम २०२४

गोंधळ कमी करण्यासाठी विशिष्ट योजनेत विशिष्ट गुंतवणूक करता येईल अशी मर्यादा काढून टाकली असून एका किंवा त्यापेक्षा जास्त योजनांमध्ये र १.५ लाखांपर्यंत गुंतवणूक / खर्च करुन वजावट मिळवता येईल.

NPS deduction : अ) (कलम ८० सीसीडी) कलम ८० सीसीडी (२) मध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन खात्यातील केंद्र अथवा राज्य सरकारने भरलेल्या १४% अंशदान उत्पन्नाचे निर्धारण करताना संपूर्णपणे वजावटीस पात्र आहे. तसेच कर्मचाऱ्याचे स्वतःचे १०% अंशदान हे कलम ८० सी अंतर्गत वजावटीस पात्र आहे.

वैद्यकीय विमा योजना (कलम ८० डी) : या योजनेअंतर्गत वैद्यकीय खर्चाची भरपाई मिळण्यासाठी असणारी ‘मेडिक्लेम पॉलिसी’ आणि वैद्यकीय तपासणीसाठी केलेला खर्च (र ५,०००/-) स्वतः, स्वतःच्या पती / पत्नी / मुले/ आई / वडिलांसाठी केलेली असेल तर ₹ २५,०००/- ची सुट मिळेल.

तसेच या योजनेअंतर्गत जर करपात्र व्यक्तींचे आई वडील हे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या वैद्यकीय विमा य वैद्यकीय खर्चावर र ५०,०००/- ची वजावट मिळेल. वरील दोन्ही प्रकारातील खर्च/हते हे बँकेतून झालेले पाहिजेत.

नॅशनल पेन्शन स्कीम :– कलम ८० सीसीडी (आयबी) या कलमाखाली कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून त्या खात्यामध्ये भरलेल्या ₹ ५०,०००/- पर्यंतच्या रकमेला सुट मिळेल.

उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज सुट (कलम ८० ई) :- स्वतःच्या पती/पत्नी/मुलांच्या उच्च शिक्षणाकरिता घेतलेल्या कर्जावरील भरलेल्या पूर्ण व्याजाची सुट या कलमान्वये मिळेल. 

अवलंबून असणाऱ्या अपंग व्यक्तीसाठी केलेला वैद्यकीय खर्च व गुंतवणूक : (कलम ८० डीडी) या अशा अवलंबून असणाऱ्या व्यक्तीसाठी केलेल्या खर्चाची किंवा गुंतवणूकीची वजावटीची मर्यादा र ७५,०००/- पर्यंत वाढविणेत आली आहे.

अपंगत्य हे जर गंभीर स्वरुपाचे (८०% किंवा जास्ती) असेल तर र १,२५,०००/- एवढी सुट मिळेल. १०) अपंगत्व : (कलम ८० गु): करदाता स्वतः ४०% पेक्षा जास्त अपंग असेल तर या कलमान्वये सुट र ७५,०००/- एवढी आहे.

Leave a Comment