Close Visit Mhshetkari

Juni Pension : खुशखबर ! ” या” राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार जुनी पेन्शन योजना ; अंमलबजावणी संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित …

Juni pension : वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक ०२.०२.२०२४ अन्वये दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.

Juni Pension Yojana

ज्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या प्रकरणी सदर अधिकारी कर्मचारी यांची राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून करावयाची कार्यपध्दती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागू करण्याबाबत विकल्प संबंधित राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करावा.

विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी संबंधित विकल्प अर्जाची तपासणी करुन प्रस्तुत कर्मचारी यांची नियुक्ती संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक २ अनुसार दि.०१.११.२००५ पूर्वीच्या जाहिरातीवर आधारित आहे. हे निश्चित करुन असे प्रस्ताव नियुक्ती प्राधिकारी यांचेकडे सादर करावेत. 

नियुक्ती प्राधिकारी यांनी संबंधित कर्मचारी हा अन्य सेवेतून आपल्या विभागातील सेवेत रुजू झाला आहे किंवा कसे याची खात्री करुन त्याची पूर्वीची सेवा राज्य शासनाच्या सेवेस जोडून देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत किंवा कसे याची निश्चितता करावी.

ज्या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याची सेवा जोडून देण्यात आलेली नाही,अशी तपासणी अंती खात्री झाल्यास नियुक्ती प्राधिकाऱ्याने प्रथम संबंधित कर्मचाऱ्याची सेवा जोडून देण्याचे प्रस्ताव प्राप्त करुन घेऊन संबंधित प्रशासकीय विभागामार्फत प्रस्ताव वित्त विभागास सादर करावेत. 

एकूणात सेवा जोडून दिल्यानंतरच उक्त दि.०२.०२.२०२४ च्या आदेशामधील तरतूदीनुसार नियुक्ती प्राधिकाऱ्याने कार्यवाही करावी. यासंदर्भात असेही स्पष्ट करण्यात येते की, शासन परिपत्रक, क्रमांक संकीर्ण-२०१९/प्र.क्र.३२०/सेवा ४. दि.१३.११.२०२० अन्वये शासकीय कर्मचाऱ्याच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या खात्यात जमा असलेल्या रकमेपुरता प्रान खाते जोडून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.प्रस्तुत सूचना संबंधित कर्मचाऱ्याला दि.०२.०२.२०२४ च्या शासन निर्णयान्वये अनुज्ञेय ठरणाऱ्या लाभासाठी विचारात घेऊ नयेत.

उपरोक्तप्रमाणे विकल्प निवडलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली मधील खाते तात्काळ बंद करण्यात येणार आहे.

सदरील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या प्राण (PFRAN) खात्यातील संचित रक्कमेपैकी केवळ अधिकारी / कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम त्याचे भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करणे व नियोक्त्याचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम शासनाचे खाती जमा करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.

हे पण वाचा ~  Gratuity Eligibility : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ग्रॅच्युईटी नियमात मोठा बदल ! आता अशीही मिळणार ग्रॅच्युइटी ? पहा सविस्तर ....

जुनी पेन्शन योजना लागू होणार !

१) दि.०१.११.२००५ रोजी व त्यानंतर राज्य शासनामध्ये रुजू झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांना वित्त विभागाच्या दि.०२.०२.२०२४ अन्वये वरील योजना लागू करण्यात आले आहेत, अशा प्रकरणी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या खात्यातील संचित निधी परतावा मंजूर करण्यात आला आहे.

२) याबाबत संबंधित अधिकारी / कर्मचान्याने त्यांचे संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे त्यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या खात्यातील जमा अंशदान रक्कमेचा परतावा मिळण्याबाबत मागणी करावी.

३) आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यास वरील योजना लागू झाल्याबाबत स्वयंस्पष्ट आदेशाची प्रत, त्यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या खात्यावरील कर्मचाऱ्याचे अंशदान, नियोक्त्याचे अंशदान आणि त्यावरील लाभ यांच्या संपूर्ण तपशीलासह अधिकारी/ कर्मचाऱ्याचे राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणण्याचा प्रस्तावः संबंधित कोषागार अधिकाऱ्याकडे सादर करुन त्यातील रक्कमांची मागणी करावी.

४ ) संबंधित कोषागार अधिकाऱ्यांनी अशा रक्कमांबाबत कोषागारातील अभिलेख आणि Protean/NSDL च्या संकेतस्थळावरील रक्कम याची पडताळणी करावी. 

५) अशा प्रकरणी नियोक्त्याचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यास देय ठरत नाहीत. केवळ संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याचे स्वतः वे अंशदान आणि त्यावरील लाभ अनुज्ञेय ठरतात. त्यानुसार संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याच्या “प्राण” (PRAN) क्रमांकावरील संचित (जमा झालेला) निधी संबंधित कोषागार अधिकारी यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांच्याकडे ERM सुविधेद्वारे परत मिळण्याची मागणी करावी.

६) राज्य अभिलेख देखभाल अभिकरणाने संचित निधी मागविण्याच्या ERM प्रस्तावास मंजूरी द्यावी. 

७) कोषागार अधिकारी यांनी प्राप्त रक्कमांचे दोन भाग करावेत. यातील प्रथम भाग म्हणजे संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ आणि दुसरा भाग म्हणजे शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ

८) यातील प्रथम भाग म्हणजे संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ. कोषागार अधिकारी यांनी मुख्य लेखाशिर्ष ८००९, राज्य भविष्य निर्वाह निधी, उपशीर्ष-०१, लघुशिर्ष-१०१, सामान्य भविष्य निर्वाह निधी मध्ये चलनाने जमा करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे वर्ग करावा.

९) त्यानंतर संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात सदरची रक्कम जमा करण्यासाठी महालेखापाल कार्यालयास प्रस्ताव सादर करावा. महालेखापाल कार्यालय सदर रक्कम जमा चलनाच्या आधारे संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा करेल.

Leave a Comment