Gratuity Extended : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की आत्ताच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे.
सरकारने ग्रॅज्युटीसाठीची रक्कम 25 लाख रुपये केली आहे.आता या रकमेपर्यंत ग्रॅच्युइटी झाल्यास त्यावर कुठलाही टॅक्स द्यावा लागणार नाही.यापूर्वी ही मर्यादा २० लाख रुपये इतकी होती.
टॅक्स फ्री ग्रॅच्युइटी लिमिट
सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्स अर्थात CBDT ने 8 मार्च 2019 च्या नोटीफिकेशनमध्ये टॅक्स फ्री ग्रॅच्युइटी लिमिट 10 लाखांहून वाढवून 20 लाख करण्यात आले होते.
केंद्रीय कॅबिनेटने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केलेली आहे.आता कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 50% दराने मिळणार आहे विशेष म्हणजे या महागाई भत्ता सोबत 2 महिन्याचा एरिया सुद्धा देण्यात येणार आहे. मार्च महिन्याच्या पगारांसोबत सदरील महागाई भत्ता वाढीबरोबरच फरक सुद्धा मिळणार आहे.
उदाहरणाद्वारे जर सांगायचे झाले तर एखाद्या कर्मचाऱ्यांच्या नुसार बेसिक सॅलरी जर,18000 असेल तर त्याला आता 50 टक्के दराने 9 हजार रुपये महागाई भत्ता मिळणार आहे.
Employees gratuity calculator
ग्रॅच्युइटीची गणना कर्मचाऱ्याचा मूळ पगार कर्मचाऱ्याच्या सेवेची वर्षे प्रामुख्याने दोन घटकांवर अवलंबून असते.
ग्रॅच्युईटी फॉर्म्युला – शेवटचा काढलेला पगार X १५/२६ X सेवा वर्षांची संख्या
उदाहरणार्थ, रामने एका कंपनीत 20 वर्षे काम केले आहे. त्याचा शेवटचा काढलेला मूळ पगार + महागाई भत्ता रु. 30 हजार रूपये असेल तर अशा कर्मचाऱ्यांना किती मिळेल?
ग्रॅच्युइटीची गणना – 30000 X15 /26 X 20 = 346150 रु. ग्रॅच्युएटी म्हणून दिली जाईल.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?