Raksha Bandhan : रक्षाबंधन हा एक असा सण आहे की ज्याची वाट बहीण भाऊ वर्षभर बघत असतात व बहिण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून दिली जाते. रक्षाबंधन म्हणजे भावंडांनी एकमेकांची कठीण काळात रक्षा करायची आठवण करून देणारे एक बंधन यादिवशी राखीच्या रूपात बहिण भावाच्या हातावर बांधते. पारंपरिक रीतींनुसार भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते पण कालानुरूप आता अनेक संकल्पना बदलत असुन.
भावंडांना प्रेम व्यक्त करण्याची संधी हा दिवस देत असतो. रक्षाबंधन या शब्दाचा अर्थ सुद्धा या नात्याइतकाच सहज आणि सोपा . भावंडांनी एकमेकांची कठीण काळात रक्षा करायची आठवण करून देणारे एक बंधन यादिवशी राखीच्या रूपात हातावर बांधले जाते. त्यामुळेच भावंडांनी एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचा हा दिवस आहे असे म्हणता येईल.
राखी पौर्णिमा मराठी माहिती
भावंडांनी एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचा हा दिवस आहे असे म्हणता येईल.आपण ज्या दिवसाविषयी बोलतोय तो दिवस यंदा आहे तरी कधी? अधिक श्रावणामुळे यंदा सर्वच सणांच्या तारखांचा गोंधळ सुरु आहे.रक्षाबंधन सुद्धा ३० की ३१ ऑगस्टला आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय. याचे उत्तर पंचांगानुसार पाहूया.
दरम्यान श्रावण पौर्णिमा तिथी ही मुळात ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०: ५८ वाजता सुरू होते आणि ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७:०५ वाजता समाप्त होते.रक्षाबंधनाच्या तारखांबाबत संभ्रम निर्माण झाला होता पण वरील माहितीनुसार रक्षाबंधन हे ३० ऑगस्टलाच असणार आहे.
राखी बांधण्यासाठी
शुभ मुहूर्त ( Raksha Bandhan muhurt)
30 ऑगस्टला भद्रकाल संपल्यानंतर, तुम्ही रात्री 09:03 ते 31 ऑगस्टच्या सकाळी 7:05 पर्यंत राखी बांधू शकता. राखी बांधण्यासाठी हा काळ योग्य आहे.
अमृत सर्वोत्तम मुहूर्त: 30 ऑगस्ट रात्री 9.34 ते 10.58 पर्यंत.
योग्य वेळ: 30 ऑगस्ट रात्री 09:03 ते 31 ऑगस्ट सकाळी 07:05 पर्यंत.
भद्रकालात राखी बांधली जात नाही
शास्त्रांमध्ये भद्रकाल हे शुभ कार्य करण्यासाठी अशुभ मानले गेले आहे. भाद्र काळात केलेले शुभ कार्यही अशुभ फळ देते. विशेषत: भद्रामध्ये राखी बांधण्यास सक्त मनाई करण्यात आली असून. खरे तर भाद्र काळात रावणाच्या बहिणीने त्याला राखी बांधली होती आणि त्याच वर्षी भगवान रामाने लंकापती रावणाचा वध केला होता. एवढेच नाही तर रावणाच्या संपूर्ण वंशाचा नायनाट केला. त्यामुळे भाद्रमध्ये राखी बांधल्याने भावाचे आयुष्य कमी होते अशी धार्मिक मान्यता आहे. असे म्हटले जाते.
राशीनुसार राखीचा रंग
- मेष – लाल रंग
- वृषभ – निळा रंग
- मिथुन – हिरवा रंग
- सिंह – पांढरा रंग
- कर्क – सोनेरी किंवा पिवळा रंग
- कन्या – हिरवा रंग
- तुला – पांढरा किंवा सोनेरी पांढरा रंग
- वृश्चिक – लाल रंग
- धनु – पिवळा रंग
- मकर – निळा रंग
- कुंभ – निळा रंग
- मीन – सोनेरी, पिवळा किंवा हळदीचा रंग.
महत्त्वाचे :- सदरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.अधिक माहितीसाठी संबंधित विषयाच्या यज्ञाचा सल्ला घ्यावा.