Retirment age : शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरुन ६० पर्यंत वाढविण्यात येत असल्याच्या बातम्या समोर येत असताना,आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे एक पत्र लिहून वेगळीच भूमिका मांडली आहे. तर पाहूया काय आहे बातमी सविस्तर.
Goverment Employees Retirement Age
जयंत पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिण्यात आलेले असून त्यामध्ये त्यांनी खालील बाबींचा उल्लेख केलेला आहे.
- शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवून ६० वर्ष केल्याने आगामी दोन वर्षात शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचा-यांचे प्रमाण नगण्य होईल.
- शासन सेवेतील पदे रिक्त होणार नाहीत व नवीन बेरोजगार होतकरु उमेदवारांना शासन सेवेत प्रवेश करण्याची संधी हिरावली जाईल आणि बेरोजगारीचे प्रमाण वाढेल.
- शासन सेवेत प्रवेशाचा अंतिम २ संधी असतील असे उमेदवार संधी उपलब्ध न झाल्याने वयोमर्यादमूळे अपात्र होतील.
- सेवानिवृत्तीचे वय अजून वाढविल्यास कुंठीततेमध्ये वाढ होऊन शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार नाही.
- सद्यस्थितीत शासकीय कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये मोठ्या प्रमाणात कुंठीतता असल्याने शासनास आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा लागत आहे.आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढले त्यामुळे शासनावर आर्थिक बोजा वाढेल.
सेवनिवृत्ती वय वाढवल्यास काय होईल?
- सद्यस्थितीमध्ये निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना नियतकालिक वेतनवाढ मिळाल्याने त्यांचे मासिक वेतन जास्त आहे.
- नव्याने नियुक्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांना शासनास कमी वेतन द्यावे लागेल. त्यामुळे शासनाच्या वेतनावर होणा-या खर्चावर बचत होईल.
- उशिरा सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनात अजून वाढ होऊन निवृत्तीवेतन व इतर अनुषांगिक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष न करता त्याऐवजी शासकीय अधिकारी व कर्मचार्यांसाठी आकर्षक स्वेच्छानिवृत्ती योजना उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे.
महाराष्ट्रातील तमाम युवक वर्गावरील शासकीय सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्याचा अन्यायकारक निर्णय घेऊ नये अशी आपणास विनंती जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.
आश्र्वासित प्रगती योजनेचा १०,२०,३० वर्षांनी मिळणारा लाभ प्रत्येक कार्यालयात मिळत नाही बृहन्मुंबई महानगरपालिकेत मिळत आहे परंतु बेस्ट उपक्रमाच्या( बृहन्मुंबई महानगरपालिका अंगिकृत उपक्रम) BEST
(BMC undertaking) कर्मचाऱ्यांना आजपर्यंत लाभ मिळाला नाही
मा. जयंत पाटील यांनी वस्तुस्थिती विशद केली आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढविणे कोणत्याही परिस्थितीत योग्य वाटत नाही.
साहेबांना सरकारवर पडणा-या खर्चाच्या बोज्याची खुप चिंता आहे. सरकारला माझी विनंती आहे की साहेबांना मिळणा-या सुविधा काढून घ्या त्यांच्यावर होणा-या खर्चात १०-१५ कर्मचा-यांचा वर्षभराचा पगार निघेल…