Close Visit Mhshetkari

Gratuity Calculator : कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटी संदर्भात महत्त्वाचा बदल ? पहा किती आणि कसे मिळणार पैसे?

Gratuity calculator : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ग्रॅच्युइटी हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असतो.नुकतेच राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटीमध्ये 6 लाख रुपये वाढ करून कर्मचाऱ्यांना 20 लाखापर्यंत ग्रॅज्युटी देण्यासंदर्भात च्या मागणी संदर्भात सचिवांशी चर्चा केलेली आहे.

तर ही ग्रॅज्युएटी म्हणजे काय ? रक्कम किती मिळते? याबद्दल सविस्तर माहिती आपण लेखांमध्ये बघणार आहोत.

पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी एक्‍ट 1972

मित्रांनो कर्मचारी ग्रॅच्युइटी कायदा 1972 च्या आधारे एखाद्या कंपनीमध्ये किंवा कार्यालयात दहा पेक्षा अधिक कर्मचारी काम करत असतील तर,अशा कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी द्यावी लागते. यासाठी काही नियम सुद्धा घालून दिलेले असतात ज्यामध्ये कर्मचाऱ्यांनी सलग पाच वर्षे सेवा करणे आवश्यक असते.

एखाद्या कर्मचाऱ्यास आरोग्य समस्यांमुळे अकाली मृत्यू आल्यास,अपंगत्व किंवा निवृत्तीची इच्छा असल्यास कामगारांना रुणता रक्कम दिली जाते.नुकतच सरकारी कर्मचाऱ्यांना जे NPS धारक आहेत त्यांच्यासाठी ग्रॅच्युइटी आणि कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे.

कर्मचारी ग्रॅच्युइटी पात्रता 

ग्रॅच्युइटीच्या लाभांसाठी खालील पात्रता निकषांमध्ये बसणे आवश्यक आहे.

  • कर्मचारी सेवानिवृत्तीसाठी पात्र असावा आणि कर्मचाऱ्याने नोकरीतून निवृत्त व्हावे लागते. 
  • एका कर्मचाऱ्याने एकाच नियोक्तासह 5 वर्षे पूर्ण करणे आवश्यक
  • आजारपणामुळे किंवा अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 
हे पण वाचा ~  Family pension : खुशखबर... या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनसह कुटुंब निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी मिळणार! शासन निर्णय निर्गमित

Goverment employees gratuity

सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळेस साधारणपणे 14 लाखापर्यंत ग्रॅज्युटी रक्कम दिली जात असते. आता ग्रॅज्युएटीची रक्कम रक्कम 20 लाख रुपये करावी अशी मागणी कर्मचारी संघटनेकडून जोर धरू लागली आहे.

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सन 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना 1982 च्या कायद्यानुसार जुनी पेन्शन योजना त्याचबद्दल बरोबर सुद्धा देण्यात येते नव्हता. दरम्यान सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी मार्च 2023 मध्ये केलेल्या आंदोलनामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना जे की एमपीएस धारक आहेत. कशाला सरकारने कुटुंब निवृत्ती वेतन योजनेबरोबरच ग्रॅज्युटी सुद्धा लागू केलेली आहे.

Employees gratuity calculator 

ग्रॅच्युइटीची गणना कर्मचाऱ्याचा मूळ पगार कर्मचाऱ्याच्या सेवेची वर्षे प्रामुख्याने दोन घटकांवर अवलंबून असते.

  • ग्रॅच्युईटी फॉर्म्युला – शेवटचा काढलेला पगार X १५/२६ X सेवा वर्षांची संख्या
  • 1) उदाहरणार्थ, रामने एका कंपनीत 20 वर्षे काम केले आहे. त्याचा शेवटचा काढलेला मूळ पगार + महागाई भत्ता रु. 30 हजार रूपये असेल तर. अशा कर्मचाऱ्यांना किती मिळेल?
  • ग्रॅच्युइटीची गणना – 30000 X15 /26 X 20 = 346150 रु. ग्रॅच्युएटी म्हणून दिली जाईल.

Leave a Comment