Employees Gratuity : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की होळीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट दिले होते. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% वरून 50% करण्यात आला होता.
आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा संदर्भात आणखी एक आनंदाची बातमी समोर आली असून,ग्रॅज्युटीसह इतर भरती ही वाढणार असल्याची माहिती मिळालेली आहे. तर बघूया सविस्तर माहिती.
Central Govt Employees Gratuity
केंद्रीय कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी मध्ये वाढ करण्यात आलेले असून सरकारने मार्चमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे.आता कर्मचाऱ्यांचा डीए ४६ टक्क्यांवरून ५० % झाला आहे.
महागाई भत्ता वाढल्यानंतर अनेक महत्त्वाच्या बातम्या वाढ झालेली आहे जसे की घर भाडे भत्ता प्रवास भत्ता इत्यादी. याशिवाय आता सरकारने कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीतही वाढ जाहीर केली आहे.
भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या आदेशानुसार, DA मध्ये ५० % वाढ करण्यासोबतच सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाची मर्यादाही २५ % वाढवण्यात आली आहे.
भारत सरकारच्या सर्व रोजगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार १ जानेवारी २०२४ पासून सेवानिवृत्ती आणि मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा सध्याच्या २० लाख रुपयांवरून २५ लाख रुपये करण्यात येणार आहे.
ग्रॅच्युइटी म्हणजे काय?
आपल्याला माहिती असेल की, सरकारी त्याचबरोबर खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राजीनामा दिल्यानंतर किंवा सेवानिवृत्तीच्या वेळी बक्षीस म्हणून मिळत असते. त्यालाच ग्रॅच्युइटी असे म्हणतात. यासाठी किमान पाच वर्ष नोकरी करणे बंधनकारक असते. सरकारने ग्रॅच्युईटी योजना सुरू केल्यानंतर खाजगी तसेच सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती नंतर मोठा आधार मिळत असतो.
महागाई भत्त्यात बदल होईल का ?
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% होतो, तेव्हा तो मूळ वेतना समाविष्ट करण्यात येतो, परंतु सद्यस्थितीत महागाई भत्ता मूळ वेतनात विलीनीकरणासंदर्भात कोणताही विचार नसल्यास बातमी समोर येत आहे.थोडक्यात सरकारने तसे करण्यास नकार दिला आहे.