Close Visit Mhshetkari

Bank Loan : बॅंक कर्ज घेण्याचा प्लॅन आहे ? पगार आणि EMI चा “हा” फॉर्म्युला ठेवा लक्षात ? भासणार नाही पैशांची कमतरता

Bank loan : प्रत्येक जण कोणत्याना कोणत्या कारणासाठी कर्ज घेतो आणि नंतर कर्जाचे हप्ते आणि दैनंदिन खर्च यांच्यात ताळमेळ बसत नाही.कधी कधी आपल्याला वाटते की आपल्या डोक्यावर कर्जाचे ओझे नको.

Bank loan EMI Tips

आपल्या डोक्यावर कोणतेही कर्ज नसेल तर आपले आयुष्य किती चांगले होईल.पण वाढती महागाई आणि गरजा यामुळे काही वेळा आपल्याला नाईलाजाने कर्ज घ्यावे लागते.काही खर्च असे असतात ज्यामुळे आपल्याला बँकेतून लोन घेण्याची गरज भासते. जसे – कार लोन,होम लोन,एज्युकेशन लोन किंवा आपात्कालिन परिस्थितीत वैयक्तिक कर्ज

कोणतेही कर्ज घेताना दैनंदिन खर्चासह कर्जाची परतफेड करावी लागते हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे.कर्ज घेतल्यावर तुमच्या आर्थिक स्थितीवर लक्षणीय परिणाम होत असतो.त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी तुमच्या पगाराचा किती भाग कर्जाच्या परतफेडीत जाईल? किती रक्कम तुमच्या दैनंदिन गरजांसाठी वापरली जाईल? तुमच्या बचत आणि गुंतवणुकी मध्ये किती पैसे जातील? साठी पैसे आपल्याकडे असतील की नाही हेदेखील पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे.

पगार आणि कर्ज हप्ता ताळमेळ

कर्ज घेताना आपल्याला मिळणारा पगार आणि एम आय याचा नक्कीच विचार करायला पाहिजे साधारणपणे आपल्या पगारातील बहुतांश भाग हा पीएफ एलआयसी आणि इतर कारणामुळे पटत असतो.त्यामुळे तुमच्या हातातील पगाराच्या किंवा व्यवसायातील मासिक उत्पन्नाच्या जास्तीत जास्त 35 ते 40 % कर्ज हप्त्यामध्ये गेले पाहिजे. 

हे पण वाचा ~  Home loan संदर्भात RBI ची मोठी घोषणा! RBI गव्हर्नरने EMI बाबतीत दिली दिलासादायक माहिती

मासिक उत्पन्नाच्या जवळपास 60 % रक्कम तुमचे राहणीमान,इतर दैनंदिन खर्च,गुंतवणूक,विमा आणि बचत यावर खर्च होत असतो.कर्जाचा EMI ठरवताना,तुमच्या गरजेसाठी पुरेसा पैसा शिल्लक ठेवला पाहिजे हे ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे.आपल्याकडे आपत्कालीन परिस्थितींसाठीही पैसा असायला पाहिजे.अन्यथा, तुमच्यावर आर्थिक ताण वाढेल.

लक्षात ठेवा येणाऱ्या काळात महागाईमहागाई, वेतनवाढीमुळे तुमचा पगारही वाढेल आणि तुम्ही जास्त EMI भरण्याच्या स्थितीत असाल अशी परिस्थितीही होऊ शकते.अशा स्थितीतही तुम्हाला तुमचा हप्ता एका मर्यादेत ठेवावा लागेल आणि उरलेले पैसे वाचवावे लागतील.

How to manage loan emi

एक गोष्ट लक्षात ठेवा भविष्यात कोणतीही अप्रिय घटना घडली तरी तुमच्यावर आर्थिक ताण येणार नाही,कारण परिस्थिती कोणतीही असली तरी तुम्हाला कर्जाचा हप्ता हा भरावाच लागणार आहे.

कर्ज घेताना फक्त तुमचे स्थिर उत्पन्न लक्षात ठेवा. कर्जाच्या कॅलक्युलेशनमध्ये इतर स्त्रोतांकडून येणारं अतिरिक्त उत्पन्न समाविष्ट करू नका.

आगामी काळात कर्जावरील ईएमआय वाढूही शकतो ही वस्तुस्थिती समजून घ्या. तसंच अशा परिस्थितीसाठी तुम्हाला तयारही राहावं लागेल.

Leave a Comment