Salary hike : महाराष्ट्र राज्य परिविक्षा व अनुरक्षण संघटना या संघटनेच्या कर्मचाऱ्यांना वेतनासाठी व संघटनेच्या वेतनेत्तर बाबीसाठी १०० % अनुदान शासनाकडून देय असून शासन निर्णयान्वये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे.
सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना
सदरील संवर्गातील वर्ग तीन व चार मधील पदांना पदोन्नतीची संधी नसल्याने येथील कर्मचारी अनेक वर्षापासून एकाच पदावर कार्यरत आहेत. आता शासन निर्णयानुसार या कर्मचाऱ्यांना १ व २ लाभांची अनुक्रमे “सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना” व “सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना” लागू करण्यास सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशना दरम्यान दि.०७/१२/२०२३ रोजी नागपुर येथे झालेल्या मा. मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली होती.
सदर शासन निर्णयान्वये वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेली १२ व २४ वर्षानंतरची एक व दोन लाभाची आश्वासित प्रगती योजना महाराष्ट्र राज्य परिविक्षा व अनुरक्षण संघटनेच्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे एक लाभाची सुधारीत सेवांतर्गत योजना दि.०१/०८/२००१ पासून व त्यानंतर पहिल्या लाभापासून १२ वर्षांनी दुसरा लाभ लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Employees salary update
महाराष्ट्र राज्य परिविक्षा व अनुरक्षण संघटना, पुणे या संस्थेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सदर लाभ लागू करताना सदर कर्मचाऱ्यांची सेवा संघटनेच्या प्रचलित सेवाप्रवेश नियमांनुसार झाली असल्याची तसेच यासाठी ते पात्र असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी सचिव, महाराष्ट्र राज्य परिविक्षा व अनुरक्षण संघटना, पुणे यांची राहील.
सदर बाबीवरील होणारा खर्च मागणी क्र. एक्स-०१, २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२. समाजकल्याण, १०२ बाल कल्याण, (०२) (०३) संगोपन व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी संस्था चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सहायक अनुदान (२२३५ ३०४१) या लेखाशिर्षाखाली उपलब्ध करण्यात येणाऱ्या वेतन अनुदानातून भागविण्यात येणार आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०१०११२०१२८३५३० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.