PAN Card : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की पॅन कार्ड हा माणसाच्या त्याचबरोबर भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेला आहे सद्यस्थितीत इन्कम टॅक्स भरणाराची गडबड सुरू आहे.
Pan Card new updates
आपले पॅन कार्ड जुने असेल किंवा खराब झाले असेल तर आपल्या पॅन कार्डची दुय्यम प्रत ऑनलाईन कशी ऑर्डर करायची तेही फक्त पन्नास रुपयात याविषयी आपण सविस्तर माहिती या लेखांमध्ये बघणार आहोत.
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की जुने पॅन कार्ड झाल्यानंतर त्याची झेरॉक्स सुद्धा नीट निघत नाही.त्याचबरोबर त्याची प्रिंट सुद्धा पुसटशी असलेली आपण पाहिलेली असेल, अशावेळी पीव्हीसी स्वरूपातील अतिशय चांगले पॅन कार्ड आपण डाऊनलोड करू शकतो.
ई पॅनकार्ड सुद्धा आपण आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकतो.अतिशय सोप्या पद्धतीने आपण आपल्या मोबाईल मध्ये याची प्रत ठेवू शकतो चला तर बघूया सविस्तर.
डुप्लिकेट पॅन कार्ड ऑर्डर (New pan card apply)
- Google/Chrome वर जाऊन “Reprint Pan Card” सर्च करा.
- तुम्हाला NSDL च्या अधिकृत वेबसाइटवर पॅन कार्ड रीप्रिंट करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- तुम्ही येथे पॅन कार्ड क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड यासारखे पॅन कार्ड तपशील त्यात भरा.
- आता नियम आणि अटी स्वीकारून सबमिट कराव्या लागतील.
- आता समोर एक पेज उघडेल ज्यावर तुमच्या पॅनशी संबंधित सर्व माहिती रेकॉर्ड केली जाईल. Request OTP वर क्लिक करा.
- आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, तो येथे टाकुन प्रमाणीकरण करा.
- यानंतर तुम्ही पॅन कार्ड मिळवण्यासाठी 50 रुपये शुल्क भरा.
- शुल्क भरण्यासाठी आपण Net banking किंवा UPI वापरू शकता.
- पेमेंट नंतर, तुमचे डुप्लिकेट पॅन कार्ड 7 दिवसांच्या आत वितरित करून पाठवले जाते.
e-Pan Card Download process
तुम्ही तुमचे डुप्लिकेट पॅन कार्ड NSDL च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन ऑर्डर करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड यासारखे पॅन कार्ड तपशील प्रदान करावे लागतील. OTP प्रमाणीकरणानंतर, तुम्हाला पॅन कार्ड मिळवण्यासाठी 50 रुपये शुल्क द्यावे लागेल. पेमेंट नंतर, तुमचे डुप्लिकेट पॅन कार्ड 7 दिवसांच्या आत वितरित करून पाठवले जाईल.
NSDL portal अंतर्गत, डाऊनलोड e-Pan Card सुविधेचे दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते, म्हणजे मागील 30 दिवसांत वाटप केलेले पॅन आणि 30 दिवसांपेक्षा जुने किंवा त्याहून अधिक काळ वाटप केलेले पॅन दोन्ही मार्गांनी ई-पॅन कार्ड
आपले पॅनकार्ड येथे डाऊनलोड करा